मुंबई । इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या सत्रात आयपीएलचे शीर्षक प्रायोजक बदलले आहेत. बुधवारी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) याची अधिकृतमाहिती दिली की, आयपीएल 2020 साठी ड्रीम 11 कंपनीला मुख्य प्रायोजक होण्याचा अधिकार देण्यात आले आहे. एक दिवसानंतर आयपीएलच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरही नवीन लोगो प्रसिद्ध करण्यात आला आहे.
आयपीएल 2020 ची सुरुवात 19 सप्टेंबरपासून होत आहे. यावेळी युएईमध्ये ही स्पर्धा होत आहे. देशातील कोरोना विषाणू साथीचा प्रसार झपाट्याने होत आहे. त्यामुळे परदेशात आयपीएल आयोजित करावी लागत आहे. आयपीएलचा अंतिम सामना 10 नोव्हेंबरला खेळला जाईल. असे प्रथमच झाले आहे की इंडियन प्रीमियर लीगचा अंतिम सामना रविवारी न होता मंगळवारी होत आहे.
आयपीएलचा लोगो आयपीएलच्याच सोशल मीडिया हँडलवर शेअर केले गेले आहेत. आयपीएलच्या नवीन लोगोमध्ये काहीही नवीन नाही. मुख्य लोगोत कोणत्याही प्रकारे बदल केला नाही. लोगोत ड्रीम 11 चे नाव जोडत त्याला एक नवीन रूप दिले आहे. हाच लोगो सोशल मीडियावर शेअर केला गेला आहे. आयपीएलच्या इन्स्टाग्रामवर अकाउंटवर हा लोगो कसा दिसतो? हे विचारण्यात आले आहे.
It’s going to be a Dream run for us ????
Get ready for the biggest T20 tournament – #Dream11IPL ????
Starts from 19th September 2020 ???? @IPL pic.twitter.com/7ylYemGFKR
— Dream11 (@Dream11) August 20, 2020
वास्तविक, आयपीएल 2020 चा विव्हो कंपनी मुख्य प्रायोजक होती, परंतु भारत आणि चीनमधील वाढत्या तणावामुळे विव्होने यंदा करार रद्द केला. पुढच्या वर्षी विव्हो मुख्य प्रायोजक म्हणून परत येऊ शकते, असे असले तरी यावर्षी बीसीसीआयला नव्या प्रायोजकांशी हातमिळवणी करावी लागली.




