मुंबई । भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण गेल्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. स्थानिक क्रिकेट खेळल्यानंतरही त्याला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. गेल्या काही वर्षांपासून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याच्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अशा परिस्थितीत त्यांने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. परंतु इरफान पठाण अजूनही आयपीएल खेळू शकतो, परंतु कोणत्याही संघाने त्याची निवड केलेली नाही.
आयपीएलमधून दुर्लक्ष केल्यानंतर इरफानने परदेशी टी20 लीगमध्ये खेळण्याचा विचार केला आहे. फक्त इरफानच नाही तर न्यूझीलंडचा सलामीवीर फलंदाज मार्टिन गप्टीललाही सनरायझर्स हैदराबाद संघाने मुक्त केले आहे. अशा परिस्थितीत या दोन्ही खेळाडूंनी लंका प्रीमियर लीगमध्ये (एलपीएल) खेळण्याचा विचार केला आहे. हे दोन आंतरराष्ट्रीय स्टार खेळाडू फ्रंचायझी आधारित एलपीएल टी20 क्रिकेट स्पर्धेत रस दाखविला आहे.
एलपीएल पुढील महिन्यात होणार आहे. या लीगमध्ये एकूण 23 सामने आहेत, जे आर. प्रेमदासा स्टेडियम, दांबुला स्टेडियम, पल्लेकल स्टेडियम आणि हंबनटोटा येथील महिंदा राजपक्षे स्टेडियमवर होणार आहेत. या टी20 स्पर्धेत पाच संघ खेळतील. त्यांच्याकडे कोलंबो, कँडी, गले, दांबुला आणि जाफना हे संघ असतील. इरफान पठाण या लीगमध्ये खेळला तर तो पुन्हा कधीही आयपीएल खेळू शकणार नाही.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाने डेली न्यूजला सांगितले की, “या लिगमध्ये खेळण्यास 143 परदेशी खेळाडू खेळण्यास उत्सुक आहेत. आता या क्रिकेटपटूंची निवड करणे संबंधित फ्रंचायझींवर अवलंबून आहे,”
इरफान पठाणने आयपीएलमध्ये सनरायझर्स हैद्राबाद, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स (पूर्वी दिल्ली डेअरडेव्हिल्स) यांच्याकडून खेळले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘शुबमन गिलने कोणालाही शिवी दिली नाही,’ पहा कोण म्हणतंय
-‘हा’ माजी खेळाडू आयपीएलमध्ये कॉमेंट्री करण्यास इच्छुक; बीसीसीआयकडे केली विनंती
-विश्वविजेत्या दिग्गजाची पत्नी स्वत:ला म्हणवते ‘विधवा’
-कपिल देव म्हणताय, जगातील या ३ दिग्गजांपेक्षाही मी भारी
ट्रेंडिंग लेख-
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी