---Advertisement---

६०० विकेट्स घेणाऱ्या अँडरसनने या फलंदाजाला केलंय सर्वाधिकवेळा बाद; सचिन तेंडुलकरला सुद्धा…

On: मंगळवार, ऑगस्ट 25, 2020 9:42 PM
---Advertisement---

साऊथँम्पटन। इंग्लंड विरुद्ध पाकिस्तान संघात सुरु असलेल्या कसोटी मालिकेतील शेवटच्या कसोटीत आज (२५ ऑगस्ट) पाचव्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनने खास विक्रम केला आहे. त्याने कसोटीमध्ये ६०० विकेट्स घेण्याचा विक्रम रचला आहे. पाकिस्तानचा कर्णधार अझर अली जेम्स अँडरसनची ६०० वी विकेट ठरला.

अँडरसन कसोटीत ६०० विकेट्स घेणारा जगातील केवळ चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. तर पहिलाच वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी मुथय्या मुरलीधरन(८००), शेन वॉर्न(७०८) आणि अनिल कुंबळे(६१९) यांनी कसोटीत ६०० विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे. पण हे सर्वजण फिरकीपटू आहेत.

१५६ व्या कसोटी सामन्यात ६०० विकेट्स घेणाऱ्या अँडरसनने त्याच्या कारकिर्दीत कसोटीमध्ये सर्वाधिकवेळा ऑस्ट्रेलियाच्या पिटर सिडलला बाद केले आहे. त्याने सिडलला ११ वेळा बाद केले आहे. तर सचिन तेंडुलकर, मायकल क्लार्क, अझर अली आणि डेव्हिड वॉर्नरला प्रत्येकी ९ वेळा बाद केले आहे.

जेम्स अँडरसनने केले या फलंदाजांना कसोटीत सर्वाधिकवेळा बाद –

११ वेळा – पिटर सिडल

९ वेळा – सचिन तेंडुलकर, मायकल क्लार्क, अझर अली आणि डेव्हिड वॉर्नर

८ वेळा – शेन वॉट्सन, चेतेश्वर पुजारा, ब्रॅड हॅडिन आणि शान मसूद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---