मंगळवारी (२७ ऑक्टोबर) दुबई येथे आयपीएल २०२०चा ४७ वा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात झाला. हैदराबादविरुद्ध दिल्लीचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडाने एक नकोसा कारनामा आपल्या नावावर केला आहे.
नाणेफेक जिंकत दिल्ली संघाने हैदराबाद संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करताना गुणतालिकेत शेवटून दुसऱ्या स्थानी असणाऱ्या हैदराबाद संघाने निर्धारित २० षटकात केवळ २ विकेट्स गमावत २१९ धावा केल्या. यादरम्यान दिल्लीचा गोलंदाज रबाडाला एकही विकेट घेतला आली नाही. त्याने ४ षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक ५४ धावा दिल्या.
आयपीएलमध्ये सलग २५ सामन्यांनंतर किमान एक विकेट घेण्यात तो अपयशी ठरला आहे.
यापूर्वी तीन वर्षांपूर्वी म्हणजेच २ मे २०१७ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्याच सामन्यात खेळताना त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. त्याने त्यावेळी ४ षटके गोलंदाजी करताना सर्वाधिक ५९ धावा दिल्या होत्या.
आयपीएल २०२०मधील रबाडाची कामगिरी पाहिली, तर त्याने आतापर्यंत खेळलेल्या १२ सामन्यात १६.८६ च्या सरासरीने २३ विकेट्स घेतल्या आहेत. यासह आयपीएल २०२०ची पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला ही कॅप मिळते) रबाडाच्या नावावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘अशी’ कामगिरी करणारा कागिसो रबाडा ठरला आयपीएलच्या इतिहासातील पहिला खेळाडू
-कागिसो रबाडासाठी या ३ फलंदाजांना बाद करणे ठरणार आव्हान; जाणून घ्या कोण आहेत ते ३ फलंदाज
-IPL 2020: आज दिल्लीची कसोटी, हैदराबादला चितपट करत ठरणार प्लेऑफमध्ये स्थान मिळणारा पहिला संघ