भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने आज ते स्थान मिळवले आहे, जे मिळवणे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. भारताचा कॅप्टनकूल हा फक्त चांगला क्रिकेटपटूच नाही, तर तो स्वभावाने खूप चांगला माणूस म्हणूनही तो ओळखला जातो.
क्वचितच कुणाला वाटले असेल की, रांचीसारख्या छोट्या शहरातून येणारा मुलगा पुढे जाऊन जगभरात नाव कमवेल. पण, धोनीने संपूर्ण जगाला दाखवून दिले की नशिबाची साथ, आपली जिद्द आणि चिकाटी या गोष्टी असतील तर नक्कीच ते साध्य होते.
या लेखात आपण धोनीच्या जीवनातील अशा काही गोष्टी पाहणार आहोत, ज्या प्रत्येकाने शिकायला हव्यात. Life lessons we can learn from ms dhoni.
कधीही हार न मानणे –
जेव्हापर्यंत मैदानावर एकही चेंडू बाकी असतो, तेव्हापर्यंत धोनी जिंकण्यासाठी संघर्ष करत असतो. कदाचित या गोष्टीमुळेच धोनीला जगातील सर्वोत्कृष्ट फिनिशर समजले जाते. धोनीच्या जीवनात बरेच असे प्रसंग आले, ज्यामध्ये त्याला क्रिकेट सोडावे लागले असते. पण, धोनी अपयशी होणाऱ्यातला नव्हता. त्याने त्या प्रसंगांना तोंड दिले आणि शेवटी आपले लक्ष्य साध्य केले.
जबाबदारी स्विकारणे –
साल २०११चे विश्वचषक कोणताही भारतीय विसरू शकत नाही. विश्वचषकाच्या महत्त्वाच्या अंतिम सामन्यात धोनीने लवकर फलंदाजीला लवकर आला होता. धोनीला हे माहिती होते की, त्याच्याकडून छोटीशी जरी चूक झाली तर त्याला सर्वांच्या टिकेला सामोरे जावे लागते. पण, धोनीने स्वत:वर विश्वास ठेवला होता. त्यामुळेच भारताला तो विश्वचषक जिंकण्यात यश आले होते.
नेहमी स्वत:चे ऐकणे –
धोनीने लहानपणीपासूनच नेहमी आपल्या मनाचे ऐकले आहे. त्याच्या वडिलांना वाटत होते की, धोनीने चांगली नोकरी करावी पण त्याने आपल्या मनाचे ऐकले आणि क्रिकेटला सोडले नाही. एकदा त्याला रेल्वेमध्ये नोकरी मिळाली होती. पण त्याला क्रिकेटर बनायचे होते म्हणून त्याने नोकरी सोडली आणि क्रिकेटमध्ये आपली कारकिर्द घडवली.
दबावात अजून चांगले प्रदर्शन –
धोनीचा सकारात्मक गुण म्हणजे तो कोणत्याही परिस्थितीचा शांत राहून सामना करतो. खरं तर जेव्हा खेळाडूंवर जास्त दबाव येतो, तेव्हा त्याचे स्वत:वरचे नियंत्रण सुटते आणि त्यांची खेळी बिघडती. पण, धोनीचे या उलट होते. तो जास्त दबावात जास्त चांगले प्रदर्शन करतो.
प्रत्येकाचा सन्मान करणे –
यशाचा डोंगर पार केल्यानंतरही धोनी प्रत्येक व्यक्तिचा सन्मान करतो. त्यांच्यांशी विनम्रतेने वागतो. त्याच्या याच स्वभावामुळे सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग आणि युवराज सिंगसारखे दिग्गज खेळाडू त्याच्या नेतृत्वाखाली खेळू शकले. तसेच आत्ताच्या भारतीय संघातील युवा खेळाडू त्याचा आदर करतात.
आपल्या पराभवातून शिकणे –
तसे पाहिले तर धोनीने अनेकवेळा पराभवाचा सामना केला आहे. पण, त्याने त्याच्या पराभवाचा स्वत:वर आणि संघाच्या कामगिरीवर प्रभाव पडू दिला नाही. आपल्या पराभवाचाही त्याने खंबीरतेने स्विकार केला आणि त्यातून नव्या गोष्टी शिकल्या.
एकाग्रता –
कितीही कठीण परिस्थिती असो, पण धोनी नेहमी एकाग्रतेने खेळत असतो. मैदानावर उतरल्यानंतर त्याचे लक्ष फक्त त्याच्या खेळावर असते.
महत्त्वाच्या बातम्या –
असे ५ गोलंदाज, ज्यांनी धोनीला करु दिल्या नाहीत शेवटच्या ओव्हरमध्ये धावा
आयपीएलमधील ‘हे’ ७ विक्रम आहेत केवळ एमएस धोनीच्याच नावावर
आयसीसीची नवी क्रमवारी जाहीर, इंग्लंडच्या खेळाडूंना झाला ‘मोठा’ फायदा