भारतीय संघाचा कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni)याने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत मोठे यश मिळवले. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 19 वर्षांपूर्वी म्हणजेच 23 डिसेंबर 2004 ला सुरुवात झाली होती. शनिवारी (23 डिसेंबर) त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला 19 वर्षे पूर्ण झाली आहेत.
साल 2004 ला धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 530 पेक्षाही अधिक सामने खेळले. तसेच 17 हजांरापेक्षा अधिक धावा केल्या. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील शेवटचा सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत न्यूझीलंड विरुद्ध जूलैमध्ये खेळला. त्यानंतर त्याने 15 ऑगस्ट 2020 रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
पहिल्या आणि शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात खास योगायोग
अठरा वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या धोनीने 15 ऑगस्ट 2020 ला आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले. या दरम्यान धोनीच्या बाबतीत एक योगायोग घडला आहे. धोनी त्याच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात आणि शेवटच्या आंतरराष्ट्रीय सामन्यात धावबाद झाला.
अधिक वाचा – अठरा वर्षे आणि अनेक रेकॉर्ड्स! जाणून घ्या धोनीचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील रोमांचक प्रवास
धोनीने त्याचा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना 23 डिसेंबर 2004 ला बांगलादेश विरुद्ध खेळला होता. या सामन्यात 7 व्या क्रमाकंवार आलेला धोनी पहिला चेंडू खेळल्यानंतर लगेचच धावबाद झाला होता. त्याला तपश बैस्या आणि यष्टीरक्षक खालेद मशुदने धावबाद केले होते.
तसेच धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील शेवटचा सामना 2019 च्या विश्वचषकात मँचेस्टर येथे न्यूझीलंड विरुद्ध खेळला. या सामन्यात धोनी 49 व्या षटकात 72 चेंडूत 50 धावा करुन धावबाद झाला. त्याला मार्टिन गप्टिलने थेट स्टंपवर चेंडू फेकत धावबाद केले होते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वाढदिवस विशेष: वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी घेतली होती आंतरराष्ट्रीय निवृत्ती, क्रिकेटर हरविंदर सिंग
‘कॅप्टनकूल’ एमएस धोनीच्या आयुष्यातील माहीत नसलेल्या 4 गोष्टी