इंडियन प्रीमियर लीग २०२०चा दहावा सामना सोमवारी (२८ सप्टेंबर) मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळण्यात आला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियम, दुबई येथे हा सामना पार पडला. हा मुंबई आणि बेंगलोर संघांचा या हंगामातील तिसरा सामना होता. यापुर्वी या दोन्ही संघांनी प्रत्येकी एक-एक सामना खिशात घातला आहे. त्यामुळे हा सामना जिंकत या हंगामातील दूसरा विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ आपले उत्तमोत्तम देण्याच्या प्रयत्नान होते.
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकत सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बेंगलोरचा युवा फलंदाज देवदत्त पड्डीकल आणि ऍरॉन फिंच सलामीला फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. या दोन्ही धुरंधरांनी पहिल्याच षटकापासून फटकेबाजी करायला सुरुवात केली आणि पावरप्लेमध्ये (सुरुवातीची ५ षटके) एकही विकेट न गमावता ४९ धावा कुटल्या.
यात फिंचच्या ४० आणि पड्डीकलच्या ९ धावांचा समावेश होता. त्यानंतरही पुढील षटकात बुमराहच्या गोलंदाजीवर या फलंदाजांनी १० धावा ठोकल्या. त्यामुळे मुंबई संघाच्या कपाळावरील आट्या वाढत होत्या. अशात लवकर फिंच किंवा पड्डीकल बाद व्हावा आणि मुंबईला या सामन्यात त्यांची पहिली विकेट मिळावी म्हणून त्यांनी गणपती बाप्पाजवळ प्रार्थना केली.
मुंबई संघाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्यांनी “गपपती बाप्पा मोरया, पहिली विकेट लवकर द्या!” असे ट्विट केले. चाहत्यांना मुंबईचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात आवडल्याचे दिसत आहे. चाहत्यांनी या ट्विटला वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
गणपती बाप्पा मोरया, पहिली विकेट लवकर द्या!
— Mumbai Indians (@mipaltan) September 28, 2020
मजेची बाब म्हणजे, गणपती बाप्पांनी मुंबई संघाची ही प्रार्थना लवकरच पूर्ण केली. ९व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ट्रेंट बोल्टने फिंचला कायरन पोलार्डच्या हातून झेलबाद करत तंबूचा रस्ता दाखवला.
महत्त्वाच्या बातम्या-
‘तो सभ्य आणि शांत, दुसरा कोणी असता तर…’, सेहवागने व्यक्त केले रोखठोक मत
“संजू तो संजू है”, शशी थरूर यांच्या ‘त्या’ प्रतिक्रियेनंतर गौतमचं ‘गंभीर’ ट्विट
मुंबईविरुद्ध जिंकायचे असेल तर बेंगलोरने करावेत ‘हे’ बदल, माजी खेळाडूने दिला मोलाचा सल्ला
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलमध्ये सर्वात वेगवान २ हजार धावा करणारे ३ भारतीय फलंदाज
३ सलामीवीर जे या आयपीएल हंगामात करु शकतात खालच्या क्रमांकावर फलंदाजी
आयपीएल २०२०मध्ये विक्रमांचा पाऊस, जाणून घ्या किती आणि कोणते झालेत विक्रम