पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हॅरिस रौफ हा कोरोना व्हायरसमध्ये पुर्णपणे फसला आहे. डाव्या हाताचा हा गोलंदाज चौथ्यांदा कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आला आहे.
या खेळाडूच्या आतापर्यंत ५ कोरोना चाचण्या झाल्या असून पहिली चाचणी सोडता तो सर्व चाचण्यात पॉझिटिव्ह आला आहे. त्याची शेवटची कोरोना चाचणी लाहोर येथे झाली असून त्यातही तो पॉझिटिव्ह आला आहे.
यामुळे हॅरिसला आयसोलेशनमध्ये पाठविण्यात आले आहे. त्याला लाहोर वरुन इस्लामाबादला खास कारने परत पाठविण्यात आले आहे. २६ वर्षीय हॅऱिसचा पाकिस्तान संघाच्या मेडिकल टीमबरोबर संपर्क राहणार आहे.
आता थेट १० दिवसांनंतर हॅरिसची परत कोरोना चाचणी घेण्यात येणार आहे. पीसीएलमध्ये लाहोर कलंदर्सकडून खेळणारा हॅरिस तीन वेळा सुरुवातील पॉझिटिव्ह आल्याने त्याला इंग्लंड दौऱ्यावर पाठविण्यात आले नाही. जर तो लवकरच ठिक नाही झाला तर त्याचे इंग्लंड दौऱ्यातील टी२० मालिकेत खेळणे जवळपास कठीण आहे.
इंग्लंड दौऱ्यावर असलेला पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध ३ टी२० व ३ कसोटी सामने खेळणार आहे. ५ ऑगस्ट रोजी पहिला कसोटी सामना खेळला जाणार आहे. तर २८ ऑगस्ट पासून टी२० मालिकेला सुरुवात होईल.
वाचा- ऑस्ट्रेलियाला जाणारी टीम इंडिया इतिहासात पहिल्यांदाच जाणार मोदींच्या गुजरात मार्गे