---Advertisement---

खुशखबर! कोहली आणि कंपनी आयपीएलपुर्वी खेळणार या देशाविरुद्ध ३ टी२० सामने?

On: बुधवार, जुलै 22, 2020 1:35 PM
---Advertisement---

नवी दिल्ली | विश्वचषक व आशिया कप रद्द झाल्यामुळे आयपीएल २०२० आयोजनाचा मार्ग मोकळा झाला आहे. ही स्पर्धा २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर २०२० या काळात युएईमध्ये होणार आहे.

यामुळे भारतीय संघाला यापुर्वी बराच वेळ मिळणार आहे. यामुळे काही इंग्रंजी माध्यमातील वृत्तांनुसार भारतीय संघ युएईमध्ये दक्षिण आफ्रिकेबरोबर तीन टी२० सामने खेळण्याची शक्यता आहे.

इनसाईटस्पोर्ट्स वेबसाईटनुसार यासाठी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने भारतीय क्रिकेट बोर्डाला प्रस्ताव पाठवला आहे. काही दिवसांपुर्वीच आलेल्या एका वृत्तानुसार यापुर्वी या ३ टी२० सामन्यांसाठी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेचा दौरा करणार होता. परंतु कोविड १९ मुळे हा दौरा रद्द करण्यात आला होता.

भारतीय क्रिकेट बोर्ड व दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्ड सध्या आर्थिक संकटात सापडले आहे. यातून बाहेर पडण्यासाठी हा एक चांगला मार्ग समजला जात आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने तर आधीच सांगितले आहे की ही सिरीज झाली  नाही तर त्यांची आर्थिक संकटे वाढतील. याचमुळे त्यांनी बीसीसीआयसमोर हा प्रस्ताव ठेवला आहे.

बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने आयपीएलच आपली प्राथमिकता असल्याचे सांगितले आहे. तसेच या स्पर्धेसाठी भारत सरकारकडून मंजूरी घेणेही बाकी असल्याचे सांगितले आहे.

वाचा- आयपीएलमध्ये भल्याभल्यांना रडवणारा मुंबई इंडियन्सचा शिलेदार म्हणतोय, यावेळी माझं खेळायचं नाही पक्कं

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---