---Advertisement---

पीसीबीचा मोठा निर्णय: भारताला एकेवेळी अतिशय त्रास देणाऱ्या क्रिकेटपटूंना केले कोच

---Advertisement---

मुंबई । पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) लाहोरमधील हाय परफॉरमन्स सेंटरसाठी माजी कर्णधार मोहम्मद यूसुफ आणि अष्टपैलू अब्दुल रझाक यांची प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. पीसीबीच्या सूत्रानुसार, युसुफ आणि रझाक यांच्या व्यतिरिक्त आणखी एक माजी कसोटी क्रिकेटपटू बासित अलीलादेखील केंद्रात प्रशिक्षकपदाची ऑफर देण्यात आली होती.

प्रसारमाध्यमांशी बोलताना, युसूफने त्याला हे पद देण्यात आल्याचे कबूल केले आणि त्याला या नियुक्तीबद्दल आनंद झाला. अलिकडच्या काही महिन्यांत या केंद्रात बरीच सुधारणा झाली आहे. माजी कसोटी फिरकीपटू नदीम खान याला नुकताच डायरेक्टर म्हणून नेमण्यात आले. पीसीबीने इंग्लंड क्रिकेटचे माजी निर्देशक डेव्हिड पार्सन यांची मदत घेतली आहे. ते 2006 पासून इंग्लंड अॅन्ड वेल्स क्रिकेट बोर्डाच्या अ‍ॅकॅडमीत फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक होते.

45 वर्षीय युसूफने पाकिस्तानकडून 90 कसोटी, 288 वनडे आणि 3 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहेत, तर 40 वर्षीय अब्दुल रझाकने 46 कसोटी, 112 वनडे आणि 32 टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---