भारताचा कबड्डीपटू व प्रो कबड्डी स्टार काशिलिंग अडकेला राहत्या घरी जुगार अड्डा व दारुअड्डा चालविण्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. काशीनाथ हा सांगलीतील वाळवा तालुक्यातील कासेगावमध्ये रहातो.
काशिलिंगच्या राहत्या घरात जुगार अड्डा व दारुअड्डा चालविला जात असल्याची बातमी मिळाल्यावर पोलिसांनी त्याच्या राहत्या घरी छापा मारला व काशिलिंगसह ८ जणांना रंगेहात पकडले.
यावेळी पोलिसांनी १ लाख ६७ हजार २८० रुपयांचा माल जप्त केला आहे.
प्रो कबड्डीच्या दुसऱ्या हंगामात बेस्ट रेडरचा पुरस्कार मिळालेल्या काशीनाथने प्रो कबड्डीत ९२ सामन्यात ६१२ गुणांची कमाई केली आहे. तो बेंगलुरु बुल्स संघाचा सदस्य होता. प्रो कबड्डीत सर्वाधिक गुण घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो ९व्या क्रमांकावर आहे.
ट्रेंडिंग घडामोडी –
सर जडेजाची टिंगल करणं इंग्लंडच्या खेळाडूला पडलं महाग, जडेजाने दिले खतरनाक उत्तर
क्रिकेटपटूंनो, मोबाईल पासून दूर रहा नाहीतर…
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग