---Advertisement---

सचिन तेंडूलकर विरुद्ध राहुल द्रविड: शेवटी याचं उत्तर मिळालंच, पहा कोण आहे मोठा क्रिकेटर

On: गुरूवार, जून 25, 2020 10:22 AM
---Advertisement---

मुंबई । क्रिकेटच्या इतिहासामध्ये आतापर्यंत अनेक महान खेळाडू होऊन गेले. महान फलंदाजांच्या यादीमध्ये काही दिग्गज भारतीय फलंदाजांची नावे देखील आहेत. भारताचा माजी सलामीचा फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला आजही जागतिक क्रिकेटमध्ये ‘गॉड ऑफ क्रिकेट’ या नावाने ओळखले जाते. कसोटी क्रिकेटचा विचार केला तर राहुल द्रविड भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्तम फलंदाज मानला जातो. सचिन तेंडुलकरने भारताकडून क्रिकेट खेळताना क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात धावा केल्या आहेत पण कसोटी क्रिकेटचा विचार केला असता राहुल द्रविडचे नाव सचिनच्या आधी घेतले जाते.

कसोटी क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यापैकी कसोटी मधला सर्वोत्तम खेळाडू कोणता? असे प्रश्न क्रिकेट फॅन्समध्ये नियमित विचारतात. अखेर क्रिकेट फॅन्सच्या या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संबंधी माहिती देणारी वेबसाइट विस्डन इंडियाने टाळेबंदीच्या काळात क्रिकेट फॅन्सच्या या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे काम केले.

विस्डनने गेल्या  50 वर्षात भारतीय क्रिकेटच्या इतिहासातला सर्वोत्तम कसोटी फलंदाज कोणता असा प्रश्न विचारत मतदान घेतले. मतदानासाठी विस्डनने एकूण सोळा दिग्गज भारतीय खेळाडूंना निवडले होते.

या मतदानाच्या सेमीफायनलपर्यंत राहुल द्रविड, सुनील गावसकर, सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी स्थान मिळवले. मात्र, शेवटच्या टप्प्यात राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकर यांनी गावस्कर, कोहली यांना पाठीमागे टाकले.

विस्डनने घेतलेल्या मतदानात राहुलने सचिन तेंडुलकरला मागे टाकले आणि गेल्या पन्नास वर्षातील सर्वोत्तम कसोटी फलंदाजाचा मान पटकावला. अत्यंत चुरशीने झालेल्या या  मतदानात राहुल द्रविडला 52 टक्के तर सचिन तेंडुलकरला 48 टक्के मते पडली. या मतदानात प्रक्रियेत 11 हजार 400 फॅन्सनी सहभाग घेतला.

https://twitter.com/WisdenIndia/status/1275368110657343488

सुनील गावसकर यांनी विराट कोहलीला पाठीमागे टाकत या मतदान प्रक्रियेत तिसरा क्रमांक पटकावला. सुनील गावसकर यांच्या पारड्यात 50.5 टक्के मतदान झालं तर विराट कोहलीला टक्के 49.5 मते मिळाली.

आकडेवारीचा विचार केला तर सचिन तेंडुलकरने 200 कसोटी सामन्यात 53.78 च्या सरासरीने 15921 धावा केल्या आहेत तर राहुल द्रविडने 164  कसोटी सामन्यात 52.31च्या सरासरीने 13288 केल्या आहेत. सचिन तेंडुलकरच्या नावावर 51 शतकांची नोंद आहे. राहुल द्रविड कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---