आयपीएलच्या १३ व्या मोसमाला १९ सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होत आहे. त्याआधी सर्व संघांनी सरावाला सुरुवात केली आहे. युएईत सराव सुरू करणारा चेन्नई संघ शेवटचा संघ आहे. काहीदिवसांपूर्वी त्यांच्यासंघातील काही सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने त्यांना अन्य संघांपेक्षा एक आठवडा ज्यादाचा क्वारंटाईन व्हावे लागले. पण आता हा क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण करुन चेन्नईचा संघही शुक्रवारपासून मैदानात सरावाला उतरला.
एमएस धोनी कर्णधार असलेला चेन्नईचा संघ दुबईतील आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये सराव करत आहे. या सरावादरम्यानचे काही फोटोही चेन्नईने शेअर केले आहेत. परंतु चेन्नईचा संघ सराव करत असतानाच राजस्थान रॉयल्सचे काही खेळाडू आयसीसी क्रिकेट अकादमीमध्ये होते. त्यांचादेखील तिथेच सराव सुरु आहे. यादरम्यानचा एक व्हिडिओ राजस्थान रॉयल्सने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओवर चाहत्यांच्या अनेक मजेशीर प्रतिक्रिया आल्या आहेत.
या व्हिडिओमध्ये दिसते की चेन्नईचा संघ मैदानात सराव करत आहे. त्याचवेळी किटबॅग घेऊन राजस्थान रॉयल्सचे खेळाडू तो सराव पहात मैदानाच्या बाजूने जात आहेत. या व्हिडिओला राजस्थानने कॅप्शन दिले आहे की ‘आम्ही तूम्हाला पाहिले चेन्नई सुपर किंग्स (वी सी यू चेन्नई सुपर किंग्स)’.
We see you, @ChennaiIPL. 👀#HallaBol | #RoyalsFamily | #Dream11IPL pic.twitter.com/8jXAub6GZC
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 5, 2020
या व्हिडिओला प्रतिक्रिया देताना काही चाहत्यांनी एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी चित्रपटातील’ एका संवादाची आठवण करुन दिली आहे. त्यांनी ‘पता है हम मॅच कहा हारे..’ हा संवात प्रतिक्रिया देताना लिहिला आहे.
https://twitter.com/ChandanN__/status/1302328233296146432
Pata hai hum match kaha hare ??… From the movie Dhoni. https://t.co/YZbgy4x0H4
— Arnab Bhattacharyya (@TheBongGunner) September 6, 2020
तसेच चेन्नई सुपर किंग्सनेही प्रतिक्रिया म्हणून एक जीआयएफ पोस्ट केला आहे.
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) September 5, 2020
चेन्नईच्या सरावानंतरचा आणखी एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात आयसीसी अकादमीमधून सराव करून जेव्हा धोनी हॉटेलमध्ये परत येत होता, तेव्हा कोरोनाच्या भीतीदरम्यानही मोठ्या संख्येने उभे असलेल्या चाहत्यांनी त्याच्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली असल्याचे दिसत आहे.
चेन्नई हा आयपीएलमधील एक यशस्वी संघापैकी एक संघ आहे. त्यांनी आत्तापर्यंत खेळलेल्या सर्व आयपीएल हंगामात प्लेऑफमध्ये प्रवेश केला असून ३ वेळा आयपीएलचे विजेतेपदही मिळवले आहे.