इंडियन प्रीमियर लीग २०२०चा १५वा सामना शनिवारी (३ ऑक्टोबर) पार पडला. अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात हा सामना झाला. या सामन्यात बेंगलोर संघाने ८ विकेट्सने विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने सुरुवातीला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि २० षटकात ६ विकेट्स गमावत १५४ धावा केल्या. प्रत्युत्तरात बेंगलोर संघाने १९.१ षटकात २ विकेट्स गमावत राजस्थानचे लक्ष्य पूर्ण केले आणि हंगामातील तिसरा विजय नोंदवला.
राजस्थानच्या १५५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ५३ चेंडूत नाबाद राहत ७२ धावा कुटल्या. यात त्याच्या ७ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्याच्याव्यतिरिक्त युवा फलंदाज देवदत्त पड्डीकलनेही ४५ चेंडूत ६३ धावांची अफलातून खेळी केली. तसेच यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सनेही १२ धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिले.
राजस्थान संघाकडून गोलंदाजी करताना जोफ्रा आर्चर आणि श्रेयश गोपालने प्रत्येकी १ विकेट चटकावली. तर टॉम करनने ३.१ षटकात ४० धावा देत अतिशय महागडी गोलंदाजी केली. दरम्यान त्याला एकही विकेट घेतला आली नाही. उर्वरित कोणतेही गोलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत.
तत्पुर्वी प्रथम फलंदाजीसाठी मैदानावर आलेल्या राजस्थान संघाला चांगली सुरुवात करत आली नाही. त्यांनी ५ षटकांच्या आतच स्मिथ, जोस बटलर आणि संजू सॅमसन अशा महत्त्वपूर्ण विकेट्स गमावल्या. तर १०.१ षटकात युझवेंद्र चहल आणि इशुरु उडाणाने मिळून रॉबिन उथप्पाला झेलबाद केले. पुढे ५व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या २० वर्षीय महिपाल लोमररने ४७ धावांचे योगदान दिले. त्याने ३९ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकार मारत हा आकडा गाठला.
तसेच राहुल तेवतियानेही २४ धावांचे योगदान दिले. राजस्थानच्या उर्वरित खेळाडूंना २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. त्यामुळे त्यांनी केवळ १५४ धावांचा स्कोर उभारला होता.
बेंगलोरकडून गोलंदाजी करताना चहलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. ४ षटकात २४ धावा देत त्याने हा पराक्रम केला. तर उडाणानेही २ विकेट्सची कामगिरी केली. तसेच नवदिप सैनीनेही राजस्थानचा यष्टीरक्षक बटलरची महत्त्वपूर्ण विकेट घेतली.
बेंगलोर पॉईंट टेबलमध्ये अव्वल-
बेंगलोरने आयपीएल २०२०मध्ये तिसरा सामना जिंकला आहे. चारपैकी तीन सामन्यात विराटसेनेने विजय मिळवले आहे. याबरोबर ते पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आले आहे. ४ सामन्यात त्यांचे ६ गुण झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
फ्रेंच ओपन: पुरुष एकेरीत डोमिनिक थिमने तर महिला एकेरीत सिमोना हालेपने मिळवला विजय
याला म्हणतात १-नंबर षटकार! उनाडकटच्या पहिल्याच चेंडूवर ‘त्याने’ ठोकला गगनचुंबी सिक्सर
आला रे…! वडिलांसाठी आयपीएल सोडून गेलेला ‘तो’ धुरंधर येतोय युएईला, लवकरच संघात होईल सहभागी
ट्रेंडिंग लेख-
अनुभवी खेळाडूंचा भरणा असणाऱ्या चेन्नईला लोळवणारा १९ वर्षांचा पोरगा, वाचा ‘त्याच्या’ संघर्षाची कहानी
आतापर्यंत आयपीएल २०२०मध्ये गोलंदाजांना धू धू धुणारे टॉप-१० फलंदाज, केल्यात सर्वाधिक धावा
तुम्हाला माहितीये? ‘स्विंग का सुलतान’ असा लौकिक असलेल्या ‘या’ खेळाडूला धोनीनेच दिली होती संधी