---Advertisement---

आला रे…! वडिलांसाठी आयपीएल सोडून गेलेला ‘तो’ धुरंधर येतोय युएईला, लवकरच संघात होईल सहभागी

On: शनिवार, ऑक्टोबर 3, 2020 6:52 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल्स संघासाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचा फलंदाजी अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स लवकरच आयपीएल २०२०मध्ये खेळताना दिसणार आहे. तो न्यूझीलंडवरुन युएईला येण्यासाठी रवाना झाला आहे.

राजस्थान संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यांनी स्टोक्सचा विमानात बसलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. आता हा धुरंधर रविवारी (४ ऑक्टोबर) सकाळी युएईला पोहोचेल.

यापुर्वीही स्टोक्सने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्याच्या वडिलांसोबतचा एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोखाली, “गुडबाय हे सोपे नसतात,” असे कॅप्शन देत त्याने युएईला परतण्याचे संकेत दिले होते.

युएईला पोहोचल्यानंतर स्टोक्सला ६ दिवसांसाठी राजस्थान संघाच्या दुबईतील हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येईल. दरम्यान त्याच्या दोन कोरोना चाचणीदेखील होतील आणि तो निगेटिव्ह आढळल्यास त्याला संघासमवेत जैव सुरक्षित वातावरणात सहभागी होण्यास परवानगी दिली जाईल. त्यामुळे तो ११ ऑक्टोबर रोजी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात किंवा १४ ऑक्टोबर रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात खेळताना दिसण्याची शक्यता आहे.

इंग्लंडचा क्रिकेटपटू स्टोक्सच्या वडिलांना कॅन्सर झाला होता. त्यामुळे त्याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेतून आणि आयपीएलमधून माघार घेतली होती. त्याच्या वडिलांच्या चिंतेमुळे तो क्रिकेटवर लक्ष केंद्रित करु शकत नव्हता. त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला होता.

https://www.instagram.com/p/CF21QGUlYd8/?utm_source=ig_web_copy_link

 

 

मात्र आता स्टोक्सच्या पुनरागमनामुळे राजस्थान संघाची मधली फळी खूप मजबूत होईल. गेल्या २ वर्षांपासून स्टोक्स राजस्थान संघाचा भाग आहे. आतापर्यंत त्याने राजस्थानकडून २२ सामने खेळत ३१९ धावा केल्या आहेत.

 

महत्त्वाच्या बातम्या-

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---