---Advertisement---

“डिविलियर्सने मारलेला चेंडू जपून ठेव”, आरसीबीचे भन्नाट ट्वीट

On: मंगळवार, ऑक्टोबर 13, 2020 8:48 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा यष्टीरक्षक फलंदाज एबी डिविलियर्सने सोमवारी (१२ ऑक्टोबर) कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध झालेल्या सामन्यात अतुलनीय कामगिरी केली. त्याने चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येत नाबाद राहत ३३ चेंडूत ७३ धावांची आक्रमक खेळी केली. दरम्यान त्याने ५ चौकार आणि ६ षटकार ठोकले. त्याने मारलेल्या एका षटकाराचा चेंडू एका लहान मुलाला सापडला. त्यानंतर बेंगलोरने त्या मुलाला खूप खास सल्ला दिला.

झाले असे की, डिविलियर्सने मारलेल्या एका षटकाराचा चेंडू अबु धाबीच्या स्टेडियमबाहेर असणाऱ्या रस्तावर जाऊन पडला. त्यावेळी तिथे उभ्या असलेल्या एका लहान मुलाला तो चेंडू सापडला. मग बेंगलोर संघाने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर त्या मुलाने चेंडू पकडल्याचा फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, “या चेंडूला सांभाळून ठेव बाळा. एक दिवस तुला त्याची किंमत कळेल.”

बेंगलोरचे ते ट्विट चाहत्यांना भलतेच आवडल्याचे दिसत आहे. त्यामुळे ते ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

https://twitter.com/RCBTweets/status/1315887489815662599?s=20

 

यावर्षी बेंगलोर संघ चांगल्या लयीत असल्याचे दिसत आहे. सहसा दरवर्षी शेवटच्या काही क्रमांकावर असलेला हा संघ यावर्षी मात्र गुणतालिकेच्या टॉप-४ क्रमांकात आहे. त्यांनी आतापर्यंत या हंगामात ७ सामने खेळले आहेत. त्यातील ५ सामन्यात विजय मिळवत -०.११६ नेट रन रेटसह त्यांनी गुणतालिकेत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अरे बापरे! चालू सामन्यातच फिंचने दिली रसेलला शिवी, पाहा पुढे काय झालं

गुपीत आले समोर! अश्विनने जर्सीचा नंबर अचानक केला होता ९९९ वरून ९९, जाणून घ्या कारण

“थोडी वाट पाहा, या वर्षाअखेर तो टीम इंडियात दिसेल,” माजी क्रिकेटरचा दावा

ट्रेंडिंग लेख-

आयपीएल २०२०: चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश असावा ‘असे’ ३ खेळाडू

एकेकाळी क्रिकेटचं मैदान गाजवलेला विराटचा मित्र बिहारच्या राजकारणात ठरतोय ‘किंग’

स्वार्थी राजकारणामुळे देशाने गमावलेला अस्सल हिरा.! ७० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळलेले एकमेव खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---