---Advertisement---

आयपीएल २०२०ची अंतिम लढाई लढण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, म्हणाला…

On: सोमवार, नोव्हेंबर 9, 2020 5:28 PM
---Advertisement---

अबु धाबीमध्ये रविवारी (८ नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने सनरायझर्स हैदराबादला १७ धावांनी पराभवाची धूळ चारली. त्यामुळे आता अंतिम सामन्यात दिल्ली संघ मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. दिल्लीला अंतिम सामना जिंकत पहिल्यांदा ट्रॉफी पटकावण्याची संधी आहे, तर मुंबईसाठी ही पाचव्यांदा विजेता बनत इतिहास घडवण्याची वेळ आहे. या सामन्यापूर्वी मुंबईचा माजी खेळाडू सचिन तेंडुलकर याने संघाला एक खास संदेश दिला आहे.

पाहा काय म्हणाला सचिन?
मुंबई इंडियन्सने सचिनचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. त्यामध्ये सचिन म्हणाला की, “मुंबई संघामध्ये जेव्हाही एखादा खेळाडू सहभागी होतो, तेव्हा तो एकटा नसतो. त्याला संघमालकपासून ते सहयोगी कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांचा पाठिंबा असतो. ते सदैव तुमच्याकडून उत्कृष्ट काढून घेण्याच्या प्रयत्नात असतात.”

“मुंबई इंडियन्स हे एक मोठे कुटुंब आहे. इथे सर्वांना चढ-उतांराना सामोरे जावे लागते. तरीही तुमची एकता महत्त्वाची असते. कितीही कठीण परिस्थिती ओढवली तरी सर्वांनी एक संघ म्हणून एकत्र राहिले पाहिजे. विशेष म्हणजे, सध्या टूर्नामेंट वेगाने पुढे जात असताना ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. मला तुम्हा सर्वांवर विश्वास आहे. नक्कीच तुम्ही एकजुटीने राहाल,” असे शेवटी सचिनने म्हटले.

https://twitter.com/mipaltan/status/1325656862470103041?s=20

अंतिम लढत मुंबई विरुद्ध दिल्ली संघात

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील अंतिम सामना अवघ्या एका दिवसावर आला आहे. १० नोव्हेंबर रोजी दुबईच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात ही रंगतदार लढत होईल.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई विरुद्ध ‘ही’ रणनीती वापरणार दिल्लीचा संघ, कर्णधार श्रेयस अय्यरचा खुलासा

‘पंड्या’ ब्रदर्समध्ये कोण आहे सर्वात स्मार्ट? कायरन पोलार्डने घेतले ‘हे’ नाव

योगायोग आलाय जुळून! दिल्ली जिंकणार आयपीएलचे पहिले विजेतेपद?

ट्रेंडिंग लेख-

लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---