---Advertisement---

अतिशय खास व्यक्तीकडून धोनीसाठी खास मेसेज, तू जे केलंय….

On: सोमवार, ऑगस्ट 17, 2020 5:41 PM
---Advertisement---

मुंबई । भारताचा सर्वात यशस्वी माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर एमएस धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. धोनीने 15 ऑगस्ट रोजी एका इंस्टाग्राम पोस्टद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्यांनंतर धोनीची पत्नी साक्षीने त्यांच्यासाठी एक खास संदेश लिहिला आहे. साक्षीने इंस्टाग्रामवर धोनीचा एक फोटो शेअर केला आणि लिहिले की, आपण जे साध्य केले त्याचा अभिमान बाळगायला हवा.

धोनीने 2019 च्या विश्वचषक उपांत्य सामन्यानंतर कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नव्हता. इंडियन प्रीमियर लीगचा 13 वा हंगाम सुरू होण्यापूर्वी निवृत्तीची घोषणा केली होती.

साक्षीने इंस्टाग्रामवर लिहिले की, ”तुम्ही जे साध्य केले त्याचा तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे. खेळास आपले सर्वोत्तम योगदान दिल्याबद्दल अभिनंदन. मला तुमच्या कामगिरीचा मला अभिमान आहे. मला माहित आहे की, आपल्या पॅशनला निरोप देताना तुम्ही अश्रू थांबवले असतील. भविष्यासाठी शुभेच्छा!”

https://www.instagram.com/p/CD60JnWHibP/

या व्यतिरिक्त साक्षीने धोनीसाठी प्रसिद्ध अमेरिकन कवी माया एंजेलूचा कोटही शेअर केला. त्यांनी लिहिले, ”तुम्ही काय बोललात हे लोक विसरतील, तुम्ही काय केले हे लोक विसरतील, पण तू त्यांना कशाप्रकारे वागवले आहेस, हे लोक कधीही विसरणार नाहीत. – माया एंजेलो”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---