---Advertisement---

एकवेळी धोनीवर दंड ठोठावणारा पंचच आता म्हणतोय धोनी जगातील सर्वात हुशार क्रिकेटपटू

On: शनिवार, ऑगस्ट 1, 2020 12:53 PM
---Advertisement---

मुंबई । आयसीसी एलिट पॅनेलमधील पंच सायमन टॉफेलने नुकतेच चपळ क्रिकेटपटूचे नाव सांगितले आहे. यावेळी त्यांनी इतर कोणाचे नाव घेतले नसून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याचे नाव सांगितले.

सायमन टॉफेल ‘क्रिकेट एज’ शी बोलताना म्हणाले, “धोनी हा क्रिकेट जगतातील सर्वात हुशार खेळाडू आहे. तो एक भारतीय आहे म्हणून मी म्हणत नाही. मी त्याला पूर्णपणे पाहिले आहे. तो रणनीती बनविण्यात हुशार आहे. त्याचा स्वभाव तसेच संयम कमालीचा आहे.”

टॉफेल यांनी केप टाऊनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यातला किस्सा सांगितला. ते म्हणाले, ” श्रीसंत केपटाऊनमध्ये षटक टाकण्यासाठी 7-8 मिनिटे घेत होता, त्यामुळे आम्हाला धोनीवर स्लो ओव्हर रेटचा (षटक सावकाश टाकणे) दंड ठोठवावा लागला. यानंतर इतर पंच व धोनी ड्रेसिंग रूममध्ये बसलो होतो. आम्ही त्याच्याशी ओव्हर रेटबद्दल बोलत होतो. आम्ही धोनीला सांगितले की जर त्याने डर्बनमध्ये अशीच चूक पुन्हा केली तर त्याच्यावर एक मॅचची बंदी लागू शकते. यावर धोनी म्हणाला की ठीक आहे मला ब्रेक हवा आहे. मी सामना संपवून जाईल. श्रीसंत त्या सामन्यात खेळणार नाही. त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही.”

धोनी ‘कॅप्टन कूल’ म्हणूनही ओळखला जातो. 2007 आयसीसी टी 20 विश्वचषक, 2011 चा वनडे विश्वचषक आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी या तीन आयसीसी स्पर्धा जिंकणारा तो एकमेव कर्णधार आहे. इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये धोनीने चेन्नई सुपर किंग्जला तीन वेळा विजेतेपद जिंकून दिले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-आयपीएलमध्ये मिळाली नाही संधी आता निवृत्तीनंतर एलपीएल मध्ये खेळणार ‘हा’ भारतीय खेळाडू

ट्रेंडिंग लेख-

-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर

-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी

-क्रिकेटच जीव की प्राण: कुटुंबातील सुख-दु:खाच्या क्षणांना बाजूला ठेवत क्रिकेटला प्राधान्य देणारे १० खेळाडू

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---