मुंबई । ‘कोची एक्सप्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेला वेगवान गोलंदाज एस श्रीसंत क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी तयार आहे. यासाठी तो मायकल जॉर्डनचे माजी ट्रेनर टीम ग्रॉव्हर यांच्याकडून मेंटल कंडीशनिंग बाबत मार्गदर्शन घेत आहे.
श्रीसंत क्रिकेटमध्ये दमदार पुनरागमन करण्यासाठी कोणतीच कसर सोडत नसल्याचे दिसून येत आहे. तो राष्ट्रीय बास्केटबॉल लीगमधील प्रसिद्ध फिजिकल अँण्ड माईंड ट्रेडिंग कोच टीम ग्रोवर यांच्याकडून ऑनलाइन मेंटल कंडीशनिंग धडे घेण्यासाठी पहाटे पाच वाजता उठतो. मायकल जॉर्डन आणि कोबे ब्रायंट यांनी देखील हे ट्रेनिंग घेतले आहे.
श्रीसंत पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला, “ग्रॉवर एनबीएमधील मोठ्या नावांपैकी एक आहे. मी आठवड्यातील तीन दिवस सकाळी साडेपाच ते साडेआठ यादरम्यान ऑनलाइन मार्गदर्शन घेतले. त्यानंतर अर्नाकुलम तेथे इंडोर नेटमध्ये दुपारी दीड ते सहा वाजेपर्यंत सराव करतो. येथे 23 वर्षांखालील आणि रणजी ट्रॉफीतील सचिन बेबी सारखे काही खेळाडू सराव करत असतात.”
“मला भीती होती की, मी क्रिकेट खेळण्यास पुन्हा सुरू केल्यानंतर लोक मला काय म्हणतील. मी कोणत्या दुःखातून प्रवास केला आहे? याची सर्वांना कल्पना आहे. याच्या पाठीमागे कोण आहे हे काही दिवसात समोर येईल. माझी निवड होण्यासाठी मी सर्वोत्कृष्ट प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करीन.”
श्रीसंतवर बीसीसीआयने २०१३ च्या आयपीएलमध्ये झालेल्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे आजीवन बंदी घातली होती. परंतु, मार्च २०१९ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने बीसीसीआयच्या अनुशासन समीतीला श्रीसंतच्या बंदीचा कालावधी कमी करण्यास सांगितले होते.
त्यामुळे २०१९ मध्ये त्याच्या बंदीचा कालावधी ७ वर्षांचा करण्यात आला होता. पण त्यावेळी त्याच्या निलंबनाचे ६ वर्षे आधीच पूर्ण झाले असल्याने आता १३ सप्टेंबर २०२० ला त्याच्या बंदीच्या ७ वर्षांचा कालावधी पूर्ण होणार आहे. त्यामुळे केरळ क्रिकेट असोसिएशनने असा निर्णय घेतला आहे, की जर श्रीसंतने आपली तंदुरुस्ती सिद्ध केली, तर त्याची निवड रणजी संघात केली जाईल.
तसेच 2021 च्या आयपीएल लिलावात नाव देणार का?असा प्रश्न विचारल्यावर श्रीसंत म्हणाला की,” चांगली कामगिरी केली तर निश्चितच मी आयपीएलमध्ये सहभागी होईल. मला चांगल्या कामगिरीच्या अपेक्षा आहे. 37 वर्षीय श्रीसंतने भारताकडून खेळताना 90 आंतरराष्ट्रीय सामन्यात 169 बळी घेतले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी –
…आणि ‘या’ गोष्टीला वैतागलेल्या सचिनने कर्णधार पदाला ठोकला राम राम
हा निव्वळ वेडेपणा आहे! हार्दिक पंड्याचा व्हिडीओ पाहून बाॅलीवूड अभिनेत्रीची प्रतिक्रीया
तो दादाच आहे… अगदी ट्विटरवरही इंग्लडच्या नासीर हुसेनला ठरला भारी