मुंबई । भारताचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैना सराव करण्यासाठी शुक्रवारी वेगवान मोहम्मद शमीच्या अमरोह येथील फार्म हाऊसवर गेला होता. त्यावेळी त्यांच्यासोबत मुरादाबादचा क्रिकेटर पीयूष चावला, मोहम्मद शमीचा छोटा भाऊ मोहम्मद कैफ हे देखील या ठिकाणी सरावासाठी आले होते. चौघे मिळून बराचवेळ सराव करत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रैना शुक्रवारी रात्री उशिरा अमरोहा येथे मोहम्मद शमीच्या घरी आला होता. त्याने शनिवारी शमीसोबत त्याच्या फार्महाऊसवर सराव केला. सुरेश रैना मोहम्मद शमीच्या घरी आल्याची माहिती कुणालाच नव्हती. तो गुपचुपपणे सराव करून निघून गेला. सोशल मीडियावर रात्री उशिरा मोहम्मद शमी रैना आणि चावला यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर याची माहिती मिळाली.
https://twitter.com/MdShami11/status/1284594558047670273
मोहम्मद शमीच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरेश रैना हा मोहम्मद शमीची वैयक्तिक भेट घेण्यासाठी आला होता. यादरम्यान त्याने सरावही केला. यावेळी त्याने मीडिया आणि सर्वसामान्य क्रिकेट फॅनपासून स्वतःला दूर ठेवले.
https://twitter.com/ImRaina/status/1284508768701681664
यापूर्वी सुरेश रैना गाजियाबाद येथे भारताचा युवा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांच्यासोबत सराव करताना दिसून आला. त्या सरावाचे काही व्हिडिओ रैनाने सोशल मीडियावर शेअर केले होते. आयपीएलच्या तारखा कोणत्याही क्षणी घोषित होतील या आशेने काही क्रिकेटपटूंनी सरावाला सुरुवात केली आहे.
Thank you so much for the amazing hospitality, had a great time being with the UP boys. Thanks for the ‘Shaami Kebab’ speciality @ 140/150k ????#ApnaUttamUttarPradesh https://t.co/88vlbGesgT
— Suresh Raina???????? (@ImRaina) July 18, 2020






