---Advertisement---

तामिळनाडूचे लोकं कधीच धोनीला विसरणार नाहीत, तो रिटायर झाल्यानंतरही…

---Advertisement---

भारताचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने इंस्टाग्रामवर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करत असल्याचे काल(१५ ऑगस्ट) घोषित केले. धोनीने घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयानंतर अनेक स्तरातून आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त केल्या आहेत.

यात ईशा फाउंडेशनचे संस्थापक, सद्गुरु यांनी देखील ट्विटरवरुन धोनीच्या निवृत्तीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की ‘धोनी फक्त दिग्गज नाही तर एक महान नेता आणि माणसांचा एक चांगला व्यवस्थापक आहे. तू तरुण आहेस, आशा आहे की तूझ्यातील नेतृत्व क्षमता अधिक महत्त्वपूर्ण मार्गाने देशाची सेवा करेल. भारतीय क्रीडा विभागात तूझा मोठा हातभार लागला आहे.’

तसेच सद्गुरु यांनी पुढे आणखी एक ट्विट करताना लिहीले, ‘तमिळ चाहत्यांना मात्र धोनीच्या निवृत्तीनंतरही त्याच्या खेळाचा आनंद घेता येणार आहे. ह्याच चाहत्यांनी त्याला आपल्या हृदयात जागा दिली आहे याची त्याला कल्पना आहे. शुभेच्छा आणि आशीर्वाद.’

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---