---Advertisement---

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी भारतीय प्लेईंग इलेव्हनची घोषणा; ‘या’ खेळाडूला मिळाली संधी

On: बुधवार, डिसेंबर 16, 2020 1:44 PM
---Advertisement---

ऑस्ट्रेलिया आणि भारत संघात १७ डिसेंबरपासून ऍडलेड येथे सुरु होणाऱ्या बॉर्डर- गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. बीसीसीआयने पहिल्या दिवस- रात्र कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाच्या प्लेईंग इलेव्हनची घोषणा केली आहे.

बीसीसीआयने ट्वीट करत याची माहिती दिली आहे. यामध्ये नुकत्याच झालेल्या दुसऱ्या सराव सामन्यात शतक ठोकणाऱ्या हनुमा विहारीला स्थान मिळाले आहे. सोबतच यष्टीरक्षक म्हणून वृद्धिमान साहाला या सामन्यात संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे अष्टपैलू रवींद्र जडेजाचा संघात समावेश असला, तरीही प्लेईंग इलेव्हनमध्ये मात्र त्याला स्थान दिलेले नाही.

याव्यतिरिक्त पृथ्वी शॉ यालाही प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. तो मयंक अगरवालसोबत सलामीला फलंदाजी करेल. गोलंदाजांमध्ये एक फिरकीपटू आणि ३ वेगवान गोलंदाजांचा समावेश केला आहे.

फिरकीपटू म्हणून आर अश्विन, तर वेगवान गोलंदाजांमध्ये उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांना संघात घेतले आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघाची प्लेईंग इलेव्हन

विराट कोहली (कर्णधार), मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), हनुमा विहारी, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---