---Advertisement---

सचिनचा पहिला ‘अप्पर कट’, जाणून घ्या केव्हा आणि कोणाविरोधात खेळला होता ‘हा’ शॉट

On: सोमवार, नोव्हेंबर 9, 2020 11:51 PM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर मानला जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने त्याच्या खेळाबाबत एक नवा खुलासा केला आहे. यूट्यूब चॅनलवर एका चाहत्याच्या प्रश्नावर उत्तर देताना त्याने ‘अप्पर कट’ बाबत सांगितले आहे. त्याने तो फटका पहिल्यांदा केव्हा आणि कोणाविरोधात खेळला होता, याची सविस्तर माहिती त्याने दिली आहे.

क्रिकेट हा खेळ आजच्या युगात अत्यंत प्रसिद्ध खेळ बनला आहे. क्रिकेटमधील काही फटके असे असतात, जे खेळणाऱ्याला आणि पाहणाऱ्याला दोघांनाही मजा येते. या सर्व फटक्यांपैकी एक म्हणजे ‘अप्पर कट’. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग या फटक्यासाठी नावाजलेला आहे. सेहवाग बाऊन्सर चेंडूवर सहजपणे हा फटका खेळतो. जर थर्ड मॅनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नसेल, तर सेहवागचा चेंडू सीमारेषेपार जातोच. सेहवाग काही वेळा या फटक्यामुळे झेलबाददेखील झाला होता.

सचिन तेंडुलकरची उंची कमी असल्याने गोलंदाज त्याला बाऊन्सर खेळवत. सचिन तेंडुलकरने पहिला अप्पर कट हा अचानकपणे खेळला होता. त्यासाठी त्याने कसलाही सराव केलेला नव्हता.

अप्पर कटबद्दल म्हणाला सचिन
यूट्यूब चॅनलवर चाहत्याने विचारलेल्या प्रश्नावर सचिन म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेतील ब्लोमफोंटेन येथे 2002 साली कसोटी सामना सुरू होता. आम्ही त्यावेळी फलंदाजी करत होतो. आणि त्यांचा गोलंदाज मखाया एंटिनी हा बऱ्याचदा ऑफ स्टम्प जवळून शॉर्ट लेंथवर गोलंदाजी करतो. तो तेव्हा क्रीजच्या बाहेरील बाजूने गोलंदाजी करण्यास येत होता आणि मला लाईनचा अंदाज लागत होता. दक्षिण अफ्रिकेच्या खेळपट्टीवर बाऊन्स जास्त असतो. अशावेळी तुम्ही चेंडूवर जाऊन खेळावं. पण चेंडू खूपच उसळी घेत असेल, तर मग आपणच त्याच्या खाली जाऊन खेळाव, असं मला वाटलं. आणि चेंडूच्या वेगाचा फायदा उचलत त्याला थर्ड मॅनच्या दिशेने खेळण्याचे माझे मन बनले. आणि मी पहिल्यांदा तो फटका खेळला.

सचिन पुढे म्हणाला की, “या फटक्यामुळे कितीतरी गोलंदाजांची डोकेदुखी वाढली आहे. कारण चेंडू निर्धाव जावी यासाठी हा चेंडू ते फेकतात. पण त्यावरही जर मोठा फटका खेळला जात असेल, तर मग त्याचा उपयोग काय? हा फटका खेळण्याआधी मी कसलाही सराव केलेला नव्हता. सहज कधी कधी परिस्थिती पाहून मन बनवून तुम्हाला खेळावे लागते. आणि मी ही तेच केले.”

महत्त्वाच्या बातम्या-

-‘हिटमॅन’ रोहित शर्माची बायोग्राफी झाली लाँच, जाणून घ्या सविस्तर

-कोहलीला RCBची कॅप्टन्सी सोड म्हणण्यामागे गंभीरचा ७ वर्षांपुर्वीचा राग ? अंपायरपर्यंत गेले होते प्रकरण

-RCB आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर विराटने बदललं वास्तव्य; पाहा काय आहे कारण

ट्रेंडिंग लेख-

-RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत

-मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ

-आयपीएलमधील ‘हे’ ४ संघ होणार मालामाल, पाहा विजेत्या- उपविजेत्या टीमच्या बक्षीसांच्या रकमा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---