मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गेल्या वर्षभरापासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चेने जोर धरू लागला होता. अखेर शनिवारी संध्याकाळी धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटसह इतर क्षेत्रातील दिग्गजांनी आपल्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली.
जुने दिवस आठवत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने ट्विट केले की, ”भारतीय क्रिकेटमध्ये तुझे योगदान खूप कौतुकास्पद आहे. 2011चा विश्वचषक एकत्र जिंकणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षण होता. तुला आणि तुझ्या परिवाराला दुसर्या ‘इनिंग’साठी शुभेच्छा.!”
Your contribution to Indian cricket has been immense, @msdhoni. Winning the 2011 World Cup together has been the best moment of my life. Wishing you and your family all the very best for your 2nd innings. pic.twitter.com/5lRYyPFXcp
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 15, 2020
बीसीसीआयचे अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली धोनीच्या निवृत्तीबद्दल म्हणाले की, “यष्टिरक्षक म्हणून संघात येऊन देशासाठी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. एक उत्कृष्ट कारकीर्द, मी त्याला शुभेच्छा देतो.”
एमएस धोनीची जुनी खेळी आठवत भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली भावूक झाला. धोनीबरोबर जुने फोटो शेअर करताना कोहलीने ट्विट केले की, “प्रत्येक क्रिकेटरला एक दिवस आपला प्रवास थांबवावा लागतो. आपण देशासाठी जे काही केले ते सर्वांच्या मनात कायम राहील.”
Every cricketer has to end his journey one day, but still when someone you've gotten to know so closely announces that decision, you feel the emotion much more. What you've done for the country will always remain in everyone's heart…… pic.twitter.com/0CuwjwGiiS
— Virat Kohli (@imVkohli) August 15, 2020
अश्विनने ट्वीट करून धोनीला त्यांच्या नव्या प्रवासाबद्दल शुभेच्छा देत लिहिले की, ” द लीजेंड नेहमीच वेगळ्या आणि अनोख्या मार्गाने निवृत्त होतात. ऐतिहासिक विजय माझ्या आठवणीत कायम राहील. आपल्या भविष्यातील सर्व प्रयत्नांसाठी शुभेच्छा.!”
The legend retires in his own style as always, @msdhoni bhai you have given it all for the country. The champions trophy triumph, 2011 World Cup and the glorious @ChennaiIPL triumphs will always be etched in my memory. Good luck for all your future endeavours. #MSDhoni
— Ashwin 🇮🇳 (@ashwinravi99) August 15, 2020
हार्दिक पंड्याने ट्विट केले की, “माझ्या कारकिर्दीतील सर्वात मोठे प्रेरणादायी बनण्यासाठी माझा मित्र आणि मोठ्या भावाला धन्यवाद. निळ्या जर्सीमध्ये तुमच्याबरोबर खेळतानाचे क्षण नेहमी आठवत राहिल. परंतु मला खात्री आहे की तुम्ही नेहमी माझ्यासाठी असाल आणि मला मार्गदर्शन करीत रहाल.”
There’s only one #MSDhoni. Thank you my friend and elder brother for being the biggest inspiration in my career. Will miss playing with you in the blue jersey but am sure you will always be there for me and will keep guiding me 🙏🏾🇮🇳 #7 pic.twitter.com/Q3j9pbcOGy
— hardik pandya (@hardikpandya7) August 15, 2020
मोहम्मद कैफ याने ट्वीट केले की, ”7 नंबरची भारतीय जर्सी पुन्हा कोणी परिधान केलेली कोणालाही कल्पना करू शकत नाही. अविस्मरणीय आठवणींसाठी एमएस धोनीचे आभार. युएई मध्ये भेटू. . .!”
A man who gave hope to every small-town cricketer looking to start their careers. He now calls time on his career as the only captain to win all 3 ICC tournaments and the greatest finisher ever. To choose Independence Day for his final goodbye speaks volumes about #MSDhoni. pic.twitter.com/UIHqpXItyy
— Mohammad Kaif (@MohammadKaif) August 15, 2020
क्रिकेटर मनोज तिवारी यांनी धोनी यांच्यासमवेत एक फोटो शेअर करताना लिहिले की, “लिजेंडने निवृत्ती घेतली आहे. उत्तम कारकिर्दीसाठी अभिनंदन. पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.”
Legend retires 👏
Congratulations on a great career
Best wishes ahead in life #MSDhoni pic.twitter.com/XtZ8zq9Tem— MANOJ TIWARY (@tiwarymanoj) August 15, 2020
विनोद कांबळीने धोनीचा खेळ आठवत लिहिले की, ”एक असा व्यक्ती जो आपल्या चाणाक्ष नेतृत्वाने आणि कौशल्याने भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर पोहोचवले.”
A man who took #TeamIndia to new heights with his smart captaincy and skills!
You'll be missed in the Indian Blue @msdhoni#MSDhoni pic.twitter.com/maAE3mDrsI— Vinod Kambli (@vinodkambli349) August 15, 2020
सुरेश रैनानेही निवृत्तीची घोषणा केली
क्रिकेटर सुरेश रैनाने थेट ‘संन्यास’ हा शब्द वापरला नाही तर आपल्या इंस्टाग्रामवर लिहिले की, “माही भाई हा भारतीय संघात तुमच्याबरोबर खेळण्याचा एक चांगला अनुभव आहे. मला अभिमान आहे. यासह मी देखील या यादीत तुमच्यासह सामील होत आहे. धन्यवाद भारत, जय हिंद ”