ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यादरम्यान चार कसोटी सामन्यांची ‘बॉर्डर-गावसकर ट्रॉफी’ खेळवली जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत मात करत, मालिकेत १-० ने आघाडी घेतली. २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे उभय संघांमध्ये मालिकेतील दुसरा सामना खेळवला जाईल. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेन व उपकर्णधार पॅट कमिन्स यांनी एका मुलाखतीत भूतकाळात केलेल्या चुकांबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
आम्ही भूतकाळात चुका केल्या आहेत
मेलबर्न येथे होणाऱ्या ‘बॉक्सिंग डे’ कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टीम पेन व उपकर्णधार पॅट कमिन्स यांनी एका मुलाखतीत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. कृष्णवर्णीय लोकांविषयी भूतकाळात आमच्याकडून नकळतपणे काही चुका झाल्याचे या दोघांनी मान्य केले. पेन म्हणाला, “माझा वर्णद्वेषाविषयीचा दृष्टिकोन मागील १२ महिन्यांपासून बदलला आहे. अमेरिकेत सुरू झालेली ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ ही चळवळ त्यासाठी कारणीभूत ठरली. या चळवळीने माझे डोळे उघडले. जगात अनेक प्रकारचे लोक असतात. कृष्णवर्णीय लोकही वेगळे नाहीत. जगभरात वेगवेगळ्या संस्कृती नांदत असतात हे मला ज्ञात झाले.”
‘ब्लॅक इमू’ पुस्तकामुळे माझी विचारसरणी बदललीपुस्तकामुळे माझी विचारसरणी बदलली
कर्णधार पेनसोबत उपकर्णधार पॅट कमिन्सने देखील या विषयावर आपले मत मांडले. कमिन्सने म्हटले, “खरं सांगायचे झाल्यास, मी भूतकाळात कृष्णवर्णीय लोकांविषयी नकळतपणे काही टिप्पण्या केल्या आहेत, हे कबूल करतो. शाळेमध्ये अनेकदा आम्हाला चांगल्या गोष्टी शिकवल्या जायच्या. ‘ब्लॅक इमू’ हे वर्णद्वेषावरील पुस्तक वाचल्यानंतर माझ्या विचारसरणीत खूप मोठा बदल झाला. ऑस्ट्रेलियातदेखील समतेचा एक चांगला इतिहास आहे.”
अमेरिकेत झाली होती ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ चळवळ
अमेरिकेत कृष्णवर्णीय कलाकार जॉर्ज फ्लॉईड यांच्या हत्येनंतर अमेरिकेत ‘ब्लॅक लाईव्ह मॅटर्स’ या चळवळीला सुरुवात झाली होती. हळूहळू या चळवळीने संपूर्ण जगभरात जोर धरला होता. क्रिकेटच्या मैदानावरही वेस्ट इंडिजचे खेळाडू या मोहिमेचे समर्थन करताना दिसून येतात.
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! आयपीएल २०२२ मध्ये दोन नवे संघ होणार सामील, बीसीसीआयने दिली माहिती