मुंबई । कोरोनामुळे तमिळनाडू प्रीमियर लीगचा (टीएनपीएल) पाचवा मोसम दुसऱ्यांदा स्थगित करावा लागला आहे. आता ही टी20 स्पर्धा यावर्षी नोव्हेंबरमध्ये किंवा पुढच्या वर्षी मार्चमध्ये आयोजित करण्याची शक्यता आहे. लोकप्रिय टी20 लीग स्पर्धा 10 जून ते 12 जुलै या कालावधीत आयोजित होणार होती. परंतु तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने (टीएनसीए) मे मध्ये ही स्पर्धा स्थगित केली. कारण त्यावेळी राज्यात कोरोना विषाणूचे प्रमाण जास्त होते.
टीएनसीएला जुलैच्या अखेरीस आणि सप्टेंबरमध्ये या स्पर्धेचे आयोजन करायचे होते. परंतु कोरोनामुळे परिस्थिती अधिकच बिघडल्यामुळे या स्पर्धेचे आयोजन होऊ शकले नाही.
याबात टीएनसीएचे मानद सचिव आरएस रामास्वामी म्हणाले की, “टीएनसीएला जुलै-ऑगस्टच्या शेवटी ते सप्टेंबर अखेरपर्यंत या लीगचे आयोजन करायचे होते. मात्र कोरोनामुळे ही लीग होण्याची शक्यता कमी आहे. नोव्हेंबरमध्ये अथवा पुढील वर्षी मार्च महिन्यात ही स्पर्धा आयोजित केली जाऊ शकते.”
आर अश्विन, दिनेश कार्तिक, विजय शंकर आणि एम विजय हे राज्याचे अव्वल खेळाडू यात खेळतात. त्यात खेळणार्या वरुण चक्रवर्ती आणि आर साई किशोर या खेळाडूंची निवड इंडियन प्रीमियर लीग मधील फ्रंचायझी संघांनी केली. तामिळनाडूमध्ये आतापर्यंत 2.5 लाखाहून अधिक कोरोना विषाणूची लागण झाली आहे तर राज्यात 4000 पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-बकरी ईदच्या निमित्ताने पीसीबीने पाठवले पाकिस्तान संघाला ‘स्पेशल गिफ्ट’, पहा व्हिडिओ
-‘या’ ज्येष्ठ भाजप नेत्याच्या मुलाला सीके खन्ना ग्रुपचे समर्थन, बनणार दिल्ली क्रिकेटचा अध्यक्ष
ट्रेंडिंग लेख-
-जिगरी दोस्त असलेले क्रिकेटर झाले एकमेकांचे वैरी, पुढे…
-क्रिकेटवर बनलेल्या या २ जबरदस्त बॉलिवूड चित्रपटांना दुर्लक्ष करुन चालणार नाही