आयपीएल २०२० या हंगामातील अर्धी स्पर्धा समाप्त झाली आहे. आयपीएलमध्ये फलंदाजांना धडाकेबाज खेळी करताना पाहणे प्रेक्षकांना जास्त आवडते. याशिवाय आयपीएलमध्ये फलंदाजांना अधिक महत्त्वाचे मानले जाते. गोलंदाजामध्ये जर फलंदाजी करण्याचे कौशल्य असेल, तर त्याला वरच्या क्रमांकावर खेळायला पाठवले जाते.
आयपीएलचे हे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. अष्टपैलू खेळाडूंना अंतिम अकरामध्ये सहजपणे समाविष्ट केले जाते. पंड्या भावंडांकडे उदाहरण म्हणून पाहिले जाऊ शकते. मुंबई इंडियन्सच्या प्रत्येक सामन्यात दोन्ही भाऊ मैदानात असतात. याखेरीज असे बरेच खेळाडू आहेत ज्यांना गोलंदाजी आणि फलंदाजी या दोन्ही क्षेत्रातील कौशल्यामुळे संघात स्थान मिळते.
याशिवाय वादळी खेळ दाखविणाऱ्या फलंदाजाचेही स्वतःचे वैशिष्ट्य आहे. अशा तुफानी खेळणाऱ्या खेळाडूंना संघात स्थान दिले जाते. या लेखामध्ये आयपीएल २०२० मधील तीन अत्यंत तुफानी खेळाडूंचा उल्लेख आहे. स्ट्राईक रेटच्या आधारे त्यांची निवड केली गेली आहे.
आयपीएल २०२० चे ३ तुफानी फलंदाज
३. निकोलस पूरन
सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघाने चांगली कामगिरी केली, तेव्हा वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरनला फारशी संधी मिळाली नाही. त्यामुळे त्याचे मोठे शॉट्स फारसे दिसले नाहीत. परंतु जेव्हा संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेत या खेळाडूने प्रभावित केले आहे. आयपीएलच्या या मोसमात आतापर्यंत पूरनने एका अर्धशतकाच्या मदतीने ७ सामन्यांत २१२ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १७७ च्या आसपास आहे. या वादळी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२. एबी डिविलियर्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या यशात या खेळाडूची भूमिका नेहमीच महत्त्वाची असते. यावेळेसही असेच काहीसे आहे. सध्याच्या आयपीएलमध्ये एबी डिविलियर्सने ७ सामन्यांमध्ये २२८ धावा केल्या आहेत. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट १८५ आहे. या वेळी एबी डिविलियर्सच्या फलंदाजीतून ३ अर्धशतकेही आली आहेत. तो या वादळी खेळी करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे.
१. कायरन पोलार्ड
या मोसमात मुंबई इंडियन्सच्या दिग्गज खेळाडूने जबरदस्त फलंदाजी केली आहे. या आयपीएलमध्ये कायरन पोलार्ड हा आतापर्यंतचा आघाडीचा फलंदाज आहे. त्याचा स्ट्राइक रेट १८९ च्या वर आहे. कायरन पोलार्डला मुंबईकडून ७ सामन्यांपैकी फक्त ६ वेळा फलंदाजीची संधी मिळाली असून त्याने एका अर्धशतकाच्या मदतीने १७४ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: सर्वांच्याच नजरेत भरेल अशी कामगिरी करणारे ५ युवा क्रिकेटर
-IPL2020 – या ६ युवा खेळाडूंनी केले सर्वांना प्रभावित, लवकरच मिळू शकते टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
-भारतीय क्रिकेटचे शापित शिलेदार भाग १७ – क्रिकेटचा गंभीर शिलेदार
महत्त्वाच्या बातम्या-
-“१०० मीटरपेक्षा लांब षटकार ठोकल्यास द्याव्या अतिरिक्त धावा” – केएल राहुल
-दिल्लीला दुखापतींनी घेरले; रिषभ पंत पाठोपाठ आता खुद्द कर्णधारावरच आले संकट
–Video: आयपीएलमध्ये ‘बिहू’ डान्सची क्रेझ; शॉला शुन्यावर बोल्ड केल्यावर आर्चरचे थिरकले पाय