सीपीएल २०२०मध्ये ट्रिनबॅगो नाईट रायडर्स संघाला थांबवणे कठीण झाले आहे. काल (५ सप्टेंबर) सीपीएल २०२० हंगामातील २७व्या सामन्यात त्यांनी अजून एक विजय मिळवला आहे. हा त्यांचा सलग ९वा विजय आहे. विशेष म्हणजे, ते आतापर्यंत खेळलेल्या एकाही सामन्यात पराभूत झाले नाहीत.
काल ट्रिनबॅगो नाईट रायडर्स विरुद्ध सेंट लुसिया झुक्स संघात सीपीएल २०२०चा २७वा सामना पार पडला. या सामन्यात ट्रिनबॅगो संघाने २३ धावांनी दमदार विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना त्यांनी ५ विकेट्स गमावत १७५ धावांची खेळी केली होती. याचे प्रत्युत्तर देत असताना सेंट लुसियाला ७ विकेट्स गमावत केवळ १५२ धावाच करता आल्या. ट्रिनबॅगोचा कर्णधार कायरन पोलार्डला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
झाले असे की, सेंट लुसिया संघाने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजी करताना ट्रिनबॅगोला सुरुवातीला मोठा झटका बसला. यापूर्वीच्या सामन्यात शतकाच्या जवळ पोहोचणारा सलामीवीर फलंदाज लेंडल सिमन्स या सामन्यात केवळ ८ धावांवर बाद झाला. त्यानंतर टियोन वेबस्टर २० धावा आणि टिम साइफर्ट ३३ धावा करत बाद झाले.
पुढे मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरलेल्या डेरेन ब्रावोने ४२ चेंडूत ५० धावांची खेळी केली. तर, कर्णधार पोलार्डने केवळ २१ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकार मारत ४२ धावांची धुव्वादार खेळी केली.
सेंट लुसियाने ट्रिनबॅगोच्या १७६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. सलामीला फलंदाजीसाठी उतरलेल्या मार्क दयालने ३३ चेंडूत ४० धावांची दमदार खेळी केली. तर, आंद्रे फ्लेचरने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना २७ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ४२ धावांची दमदार खेळी केली. पण, तो बाद झाल्यानंतर इतर फलंदाजांना जास्त चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे सेंट लुसियाला ट्रिनबॅगोचे लक्ष्य पूर्ण करता आले नाही.
ट्रिनबॅगो संघातील पोलार्डने ४ षटकात सेंट लुसिया संघाच्या ३ फलंदाजांना बाद केले. यासह त्याने सीपीएलमधील आपल्या ५० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याच्याव्यतिरिक्त, ब्रावो आणि सिल्सने प्रत्येकी २-२ विकेट्स घेण्याचा कारनामा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-दिल्ली कॅपिटल्सच्या गब्बरला दुबईत मिळाली त्याची लैला, व्हिडिओ शेअर करत दिली माहिती
-तब्बल १३ वर्ष कोहलीचं एकाच संघाकडून खेळण्याच कारणं आलं समोर, खुद्द कोहलीने सांगितलं…
-२ कोटी असो नाहीतर २० कोटी, भारतीय क्रिकेटरला कुंटूंबीय आयपीएलपेक्षा अधिक प्रिय
ट्रेंडिंग लेख-
-आयपीएल २०२०: सीएसकेमध्ये हरभजन सिंगची जागा घेऊ शकतात हे ५ भारतीय क्रिकेटर्स
-आयपीएल २०२० मधून वेगवेगळ्या कारणाने माघार घेणाऱ्या खेळाडूंची संपुर्ण यादी
-बडेमियाँ-छोटेमियाँ! आयपीएलमध्ये खेळलेल्या ३ भारतीय भावांच्या जोड्या