नवी दिल्ली। छोट्या शहरातून आलेला भारताचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने जगात चांगले नाव कमावले आहे. एका खाणकामगाराचा मुलगा असूनही त्याने आयुष्यातील प्रत्येक समस्येचा सामना करत आपले स्वप्न पूर्ण केले. आयुष्यात एवढे यश मिळवूनही त्याचा साधेपणा कायम आहे. त्याच्या याच साधेपणावर त्याची पत्नी तान्या वाधवा फिदा झाली आणि त्यांनी २०१३ मध्ये लग्न केले. त्यांच्या या प्रेमकहाणीचे श्रेय क्रिकेटलादेखील जाते. कारण क्रिकेटमुळेच त्यांची पहिली भेट झाली होती.
२०१० च्या आयपीएलमध्ये झाली होती पहिली भेट
आयपीएलमध्ये यादव जेव्हा दिल्ली डेअरडेविल्स (Delhi Daredevils) संघाकडून खेळायचा तेव्हाची ही गोष्ट आहे. दिल्ली येथे आयपीएल सामन्यादरम्यान त्याची भेट फॅशन डिझायनिंग कोर्स करणाऱ्या तान्याशी झाली होती. त्या दोघांचीही भेट त्यांच्या एका मित्राने घडवून दिली होती. तेव्हापासूनच यादव आणि तान्यामधील जवळीक वाढू लागली. पुढे ते चांगले मित्र बनले आणि हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.
तान्यावर कधीच नाराज होत नाही उमेश यादव
तान्याचे असे म्हणणे आहे, की ती यादवच्या साधेपणाने प्रभावित झाली होती. तिची यादवशी भेट झाल्यानंतर विश्वासच बसला नाही की तो इतका मोठा गोलंदाज असूनही त्याची नाळ जमिनीशी जोडलेली आहे. त्यामुळेच यादवने जेव्हा तान्याला लग्नाची मागणी घातली, तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न करता त्याला होकार दिला.
तान्यानुसार, यादवला कधीच रागवत नाही. जर तान्याला राग जरी आला, तरी तो शांत राहतो. तान्याला त्याचा हाच स्वभाव खूप आवडतो. तरीही तान्याला त्याच्याबाबतीत एका गोष्टीचा खेद आहे, तो असा की यादव तिच्यापेक्षा खूप उंच आहे. तरीही यादवला असे वाटते, की तान्या तिच्या हृदयाइतकीच सुंदर असल्यामुळे या गोष्टींचा काही फरक पडत नाही.
https://www.instagram.com/p/CBGwbwXFf96/
तान्यासाठी यादव क्रिकेटला धन्यवाद देतो
यादवला पहिल्यापासूनच शिक्षणात रस नव्हता. त्याने १२ वीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्याचे स्वप्न सैन्यामध्ये भरती होण्याचे होते. परंतु चाचणीमध्ये तो अपयशी ठरला. सैन्यामध्ये नोकरी न मिळाल्यामुळे त्याने पोलिसांत भरती होण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो तिथेही अपयशी ठरला. यादव केवळ २ गुणांनी नापास झाला होता. यानंतर त्याने आपला मोर्चा क्रिकेटच्या दिशेने वळविला. क्रिकेट जगताने त्याला त्याचे प्रेम मिळवून दिले, त्यासाठी तो क्रिकेटला धन्यवाद देतो.
यादवची गणना आज जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते. यादवने भारताकडून ४६ कसोटी सामने, ७५ वनडे सामने आणि ७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत १४४ विकेट्स, वनडेत १०६ विकेट्स आणि टी२०त ९ विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-पाकिस्तान संघामागे लागलीय साडेसाती, इंग्लंडमध्येही रहावे लागतेय अशा जागी
-पाकिस्तानचा प्रशिक्षक खेळाडूंवर भडकला; म्हणाला हे तर धोकेबाज खेळाडू
-रिषभ पंत म्हणतो, धोनीबरोबर फलंदाजी करायला आवडते, पण…