---Advertisement---

भारताला चौथा धक्का! अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे कर्णधार विराट कोहली रन आऊट?

On: गुरूवार, डिसेंबर 17, 2020 5:01 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रलिया संघात गुरुवारपासून (१७ डिसेंबर) चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु झाली आहे. ऍडलेड येथे चालू असलेल्या या दिवसरात्र कसोटी सामन्यात कर्णधार विराट कोहलीने जबरदस्त फलंदाजी प्रदर्शन केले. परंतु संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या चुकीमुळे विराटने आपली विकेट गमावली.

कॉल देऊनही रहाणेने घेतली नाही धाव

झाले असे की, नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी निवडली. त्यामुळे युवा फलंदाज पृथ्वी शॉ आणि मयंक अगरवाल सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरले. पण त्यांना संघाला चांगली सुरुवात करण्यात देण्यात यश आले नाही. शॉ डावातील दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला, तर मयंक अगरवालही १७ धावांवरच पव्हेलियनला परतला. पुढे कसोटी स्पेशलिस्ट चेतेश्वर पुजाराही अर्धशतक पूर्ण करण्याच्या आतच झेलबाद झाला.

असे असले, तरी ३ विकेट्स गमावल्यानंतर कर्णधार विराट आणि उपकर्णधार रहाणेची जोडी मिळून संघाचा डाव पुढे नेत होती. त्यांनी ७७व्या षटकापर्यंत ८१ धावांची भागीदारीही केली. ७७व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर रहाणेने साधारण शॉट मारला. या चेंडूवर एक धाव घेण्याच्या उद्देशाने त्याने विराटला धावण्याचा इशारा केला. पण त्यानंतर रहाणे धावलाच नाही. मात्र, विराट धाव पूर्ण करण्यासाठी पळला होता. तेवढ्यात ऑस्ट्रलियन खेळाडूंनी चेंडू पकडला व स्टंपच्या दिशेने फेकला आणि विराट धावबाद झाला.

https://twitter.com/gatsbyweed/status/1339526500966572033

अशाप्रकारे विराटने पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ७४ धावा केल्या. यात त्याच्या ८ चौकारांचा समावेश होता. विराटची विकेट गेल्यानंतर भारतीय संघाची धावसंख्या ७७ षटकात ४ बाद १८८ धावा इतकी होती.

महत्त्वाच्या बातम्या-

AUS vs IND Test Live : कोहलीचे अर्धशतक, कांगारूंकडून टिच्चून गोलंदाजी; ६१ षटकात भारत ३ बाद १२८ धावांवर

पहिल्या कसोटी सामन्याच्या एक दिवसआधीच केली होती टीम इंडियाने प्लेइंग XI ची घोषणा; ‘हे’ होते कारण

IND Vs AUS : ऍडलेड कसोटी सामन्यात हादरली ‘पृथ्वी’! Video व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---