---Advertisement---

इंस्टाग्रामच्या खेळपट्टीवर अशी धमाकेदार खेळी करणारा विराट पहिला भारतीय

On: मंगळवार, जुलै 28, 2020 8:53 PM
---Advertisement---

मुंबई । खेळाच्या मैदानावर अनेक विक्रम नोंदवलेल्या भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली मैदानावर व मैदानाच्या बाहेरही तितकाच लोकप्रिय आहे. देशात लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असणार्‍या विराटचे इन्स्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुकवर लाखो चाहते आहेत. यात आता भारतीय फलंदाजाने मोठे स्थान मिळवले आहे आणि असे करणारा तो पहिला भारतीय आहे.

विराटने इंस्टाग्रामवर 70 मिलियन म्हणजेच 7 कोटी फॉलोअर्सचा टप्पा पार केला आहे. विराटचे सध्या 70.2 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि ही संख्या सतत वाढत आहे. इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्समध्ये विराटने बास्केटबॉल लिजेंड लेब्रॉन जेम्सला मागे टाकले आहे. विराट हा पराक्रम करणारा पहिला भारतीयही ठरला. पोर्तुगालचा ख्रिस्टियानो रोनाल्डो प्रथम क्रमांकावर आहे. त्याचे 232 मिलियन फॉलोअर्स आहेत. अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचे 161 मिलियन फॉलोअर्स आहेत. 140 मिलियन फॉलोअर्ससह ब्राझीलचा नेमार जूनियर तिसर्‍या स्थानी आहे.

https://www.instagram.com/p/CDLyC7-FB42/

इन्स्टाग्रामवर अधिक फॉलोअर्स असणार्‍या कोहलीची कमाईपण जास्त Eहे. तो इन्स्टाग्रामवर प्रमोशन करण्यासाठी सर्वाधिक पैसे घेतो. 31 वर्षीय भारतीय कर्णधाराने नुकतीच इंस्टाग्रामवर एक हजारावी पोस्ट केली होती.

टी 20 विश्वचषक पुढे ढकलल्यामुळे यावर्षी आयपीएल युएईमध्ये होणार असल्याचे निश्चित झाले आहे. विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार आहे. बरीच वर्षे आरसीबीचा कर्णधारपद सांभाळल्यानंतरही त्याला एकदाही आयपीएलचे जेतेपदही जिंकून देता आले नाही. यावेळी संघ प्रथमच आयपीएल चॅम्पियन व्हावी, अशी त्यांची इच्छा आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---