भारताचा माजी सलामीवीर आणि आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक असणारा वसीम जाफर मागील काही काळापासून बराच चर्चेत आहे. कोरोना विषाणूच्या साथीमुळे यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम युएईमध्ये पार पडला. तेव्हापासून वसीम जाफरने सोशल मीडियावर मजेदार मीम्स आणि पोस्ट करत चाहत्यांचे मनोरंजन केले आहे. आपण जाफरची ट्विटर टाईमलाईन पाहिली, तर ती अशा गमतीदार मीम्सने भरलेली दिसून येते. आता पुन्हा एकदा, वसीम जाफरने एक मीम शेअर करत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉची बोलती बंद केली आहे.
भारताने जिंकली टी२० मालिका
रविवारी (६ डिसेंबर) सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या दुसर्या टी२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ६ गडी राखून पराभूत केले. तत्पूर्वी, पहिल्या टी२० सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ११ धावांनी पराभूत केले होते. पहिले दोन्ही टी२० सामने जिंकण्याबरोबरच वनडे मालिकेचा बदला घेत भारताने टी२० मालिका आपल्या नावे केली. भारताच्या या विजयानंतर वसीम जाफरने मायकेल वॉला ट्रोल केले आहे.
ऑस्ट्रेलिया भारताला सहज हरवेल
इंग्लंडचा माजी कर्णधार असलेल्या मायकल वॉने २७ नोव्हेंबर रोजी ट्वीट करताना लिहिले होते, ‘मला वाटते ऑस्ट्रेलिया संघ भारताला तिन्ही प्रकारच्या मालिकांमध्ये सहजरीत्या पराभूत करेल.’ त्यावर आता जाफरने ‘गँग्ज ऑफ वासेपूर’ चित्रपटातील एक छायाचित्र रिट्विट करत, वॉला ट्रोल केले आहे.
#AusvInd https://t.co/TPjLgHAvO7 pic.twitter.com/xxAGUiyRuG
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) December 6, 2020
भारताने साजरा केला मालिका विजय
काल (६ डिसेंबर) झालेल्या तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील दुसऱ्या सामन्यात, सिडनीच्या फलंदाजांसाठी मदतगार असणाऱ्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने १९४ धावांची मोठी धावसंख्या रचली. ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मॅथ्यू वेडने सर्वाधिक ५८ धावांची खेळी केली. भारताकडून युवा टी नटराजनने २० धावांत दोन बळी मिळवले.
उत्तरादाखल, सलामीवीर केएल राहुल व सलामीवीर शिखर धवनने भारताला वेगवान सुरुवात दिली. भारताने पहिल्या सहा षटकात ६० धावांची लयलूट केली. शिखर धवनने शानदार अर्धशतक झळकावले. अखेरीस, श्रेयस अय्यर व अष्टपैलू हार्दिक पंड्या यांनी ४६ धावांची भागीदारी करत, भारताला १९५ धावांचे लक्ष्य गाठून दिले. सामनावीराचा पुरस्कार आक्रमक ४२ धावा करणाऱ्या हार्दिक पंड्याला देण्यात आला.
या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी२० मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. मालिकेतील अखेरचा सामना ८ डिसेंबर रोजी सिडनी येथेच खेळवला जाईल.
महत्त्वाच्या बातम्या-
…म्हणून विराट सलग सोडतोय झेल; माजी भारतीय फलंदाजाने सांगितले कारण
‘मी माझ्या चुकांमधून शिकलो’, विजयाचा नायक ठरलेल्या पंड्याचे मोठे वक्तव्य
हार्दिक पंड्यापेक्षा ‘हा’ खेळाडू सामनावीर पुरस्काराचा खरा मानकरी, ऑस्ट्रेलियन दिग्गजाचे मत
ट्रेंडिंग लेख-
भारताकडून २०२० मध्ये वनडे सामन्यात सर्वाधिक षटकार मारणारे ३ खेळाडू; पंड्या ‘या’ क्रमांकावर
आयपीएलमध्ये अवघ्या ६३ चेंडूत १२० धावा फटकावणारा पॉल वॉल्थटी आता आहे तरी कुठे?
गोष्ट एका क्रिकेटपटूची भाग २०: सचिनचा चाहता ते सचिनचा संघसहकारी झालेला आरपी सिंग