---Advertisement---

एकच नंबर! पृथ्वी शाॅने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराट कोहली अचंबित, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, ऑक्टोबर 5, 2020 10:20 PM
---Advertisement---

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात इंडियन प्रीमियर लीग २०२०चा १९वा सामना पार पडला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे झालेल्या या सामन्यात बेंगलोरने नाणेफेक जिंकत सुरुवातीला गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात १९६ धावा केल्या. दरम्यान दिल्लीचा युवा फलंदाज पृथ्वी शॉने एक अफलातून षटकार मारला.

झाले असे की, दिल्ली संघाचे सलामीवीर फलंदाज शिखर धवन आणि पृथ्वी शॉ फलंदाजीसाठी मैदानावर उतरले. या दोन्ही धुरंधरानी पहिल्याच षटकापासून बेंगलोरच्या गोलंदाजांची धुलाई करायला सुरुवात केली. दरम्यान डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी बेंगलोरचा गोलंदाज नवदिप सैनी आला. त्याने १४३.६ किमी दर ताशी वेगाने षटकातील चौथा चेंडू टाकला आणि शॉने गुडघ्यावर बसत त्या चेंडूवर एक्स्ट्रा कव्हरच्या वरुन जोरदार षटकार लगावला.

शॉचा तो जबरदस्त षटकार पाहून बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने रिएक्शन दिली. त्याला पाहून असे वाटत होते, जणू तो शॉला त्याच्या शानदार फलंदाजी शैलीसाठी शाब्बासकी देऊ इच्छित आहे.

शॉच्या त्या दमदार षटकारानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने ट्विट करत लिहिले की, “पृथ्वी शॉने खूप शानदार शॉट मारला आहे. सोबतच चेंडूवर लाळ लावणारच तेवढ्यात विराटची मिलियन डॉलर्सची रिऍक्शन”, असेही सचिनने पुढे लिहिले.

 

https://twitter.com/Spiderverse17/status/1313121556889919488?s=20

 

असे असले तरी, पुढे ६.४ षटकात मोहम्मद सिराज आणि एबी डिविलियर्सने मिळून शॉला बाद केले. त्यामुळे तो २३ चेंडूत ४२ धावा करत पव्हेलियनला परतला.

 

महत्त्वाच्या बातम्या-

विराट पराक्रम! अवघ्या दहा धावा अन् ठरला पहिलाच भारतीय, पाहा किंग-कोहलीचा अद्भुत विक्रम

आमची उपस्थिती हाच विक्रम.! एकही चेंडू न खेळता कोहलीने बनवला जागतिक रेकाॅर्ड, जाणून घ्या

थोडक्यात वाचला कोहली! नाहीतर बसला असता ‘विराट’ दणका

ट्रेंडिंग लेख-

आयपीएलच्या ‘या’ ५ संघांतील गोलंदाजांना तोड नाही, केलाय सर्वाधिक वेळा हॅट्रिक घेण्याचा कारनामा

‘या’ ४ कारणांमुळे कमलेश नागरकोटीला भारतीय संघात मिळणार स्थान

वाढदिवस विशेष: इम्रान खान यांच्याबद्दल माहित नसलेल्या १० गोष्टी

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---