भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये पदार्पण हे ११ जानेवारी १९९२ ला ब्रिसबेन ऑस्ट्रेलिया येथे वेस्ट इंडिज संघाविरुद्ध केले. परंतु पुढील सामना खेळण्यासाठी या खेळाडूला मोठी वाट पाहावी लागली.
ज्या वेळी भारतीय संघ १९९१-९२ मध्ये ऑस्ट्रेलिया देशात तिरंगी लढतीसाठी गेला होता तेव्हा त्यावेळी काही मीडिया रिपोर्ट्सप्रमाणे राखीव खेळाडू असताना गांगुलीने मैदानावरील खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जाण्यास नकार दिला होता. त्यामुळे गांगुलीला १९९६ पर्यंत संघात स्थान मिळालं नाही. त्यांनतर गांगुलीने १९९६ साली द्रविड बरोबर लॉर्ड्स मैदानावर कसोटी पदार्पण केले होते.
त्यांनतर भारताच्या या दिग्गज खेळाडूने एका मुलाखतीमध्ये आपण असं काहीही न केल्याचे सांगितलं होतं. त्यावेळी गांगुली म्हणाला, “आमच्या संघाबरोबर रनबीर सिंग नावाचा एक मॅनेजर होता आणि त्याच्याएवढी खराब व्यक्ती मी माझ्या जीवनात पहिली नाही. ती अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे की असा मॅनेजर आमच्या संघाबरोबर होता.”
१९९२च्या त्या मालिकेनंतर सौरव गांगुलीने १९९६ सालात कसोटी पदार्पण केले. एकदिवसीय पदार्पण ते कसोटी पदार्पण या चार वर्षाच्या काळात या खेळाडूला फक्त दोन वनडे सामने खेळण्याची संधी मिळाली. त्यात गांगुलीने २४.५ च्या सरासरीने ४९ धावा केल्या होत्या.
याच काळात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भारताकडून ९३ सामन्यात ४२.४५ च्या सरासरीने ३४३९ धावा केल्या. त्यावेळी सर्वात जास्त मीडियामध्ये चर्चेत असणारा भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने ९३ सामन्यातच ३९.०५ च्या सरासरीने २८१२ धावा केल्या. श्रीनाथ आणि कुंबळे यांनी अनुक्रमे १२५ आणि १०५ विकेट्स घेतल्या.
जर कधी ह्या काळात गांगुलीला भारताकडून क्रिकेट खेळायला मिळालं असत तर?