मुंबई । यावर्षी मोहाली येथे झालेल्या रणजी करंडक सामन्यावेळी पंचांच्या निर्णयास विरोध दर्शविल्यामुळे शुबमन गिलला सामना शुल्काच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला. मात्र, युवराज सिंग म्हणतो की, त्या सामन्यात शुबमनने काहीही केले नाही तरीही त्याला दंड ठोठावण्यात आला. युवराजने शुबमनला पाठिंबा देत असे सांगितले की, 20 वर्षीय गिलमध्ये एक खास कौशल्य आहे.
हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना युवराज म्हणाला की, “सामन्यादरम्यान मी मैदानावर होतो. त्याने कुणालाही शिवीगाळ केली नाही. त्याने केवळ निर्णयावर प्रश्न उपस्थित केला. कधीकधी फलंदाज असे करतात. तो तरूण आहे आणि त्याच्यात धावांची भूक आहे. मी खेळायला सुरुवात केली तेव्हा मलाही अशा घटनांचा अनुभव आला. आणि जर एखाद्या खेळाडूने चूक केली तर तो सुधारेल. त्याच्याकडे एक खास प्रतिभा आहे.”
दिल्लीचा वेगवान गोलंदाज सुबोध भाटी याने बाद केल्यानंतर गिलने त्या सामन्यात क्रीज सोडण्यास नकार दिला. त्यानंतर शुमनला सामना फी 100 टक्के दंड ठोठावण्यात आला. पंचांना शिवीगाळ केल्याचा आरोपही त्याच्यावर लावण्यात आला. फाजिल्का येथे जन्मलेल्या या खेळाडूने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 21 सामने खेळताना 10 अर्धशतके आणि 7 शतकांसह 73.55 च्या सरासरीने 2,133 धावा केल्या. त्यामध्ये त्याच्या सर्वाधिक 268 धावा आहेत. ‘अ’ दर्जाच्या क्रिकेटमध्ये 57 सामन्यांमध्ये त्याने 45.60 च्या सरासरीने 2280 आहे. यासोबत तो आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळतो.
महत्त्वाच्या बातम्या-
-‘हा’ माजी खेळाडू आयपीएलमध्ये कॉमेंट्री करण्यास इच्छुक; बीसीसीआयकडे केली विनंती
-विश्वविजेत्या दिग्गजाची पत्नी स्वत:ला म्हणवते ‘विधवा’
-कपिल देव म्हणताय, जगातील या ३ दिग्गजांपेक्षाही मी भारी
-पीसीबीची माजी क्रिकेटर्सला खास ऑफर, पुन्हा करु शकतात आंतरराष्ट्रीय पातळीवर जबरदस्त कामगिरी
ट्रेंडिंग लेख-
-भारताकडून एकही सामना न खेळलेले परंतू आयपीएलमध्ये हॅट्रिक घेणारे ३ प्रतिभावान क्रिकेटर
-आयपीएल २०२०: ‘या’ ३ कारणांमुळे विराटचा आरसीबी संघ यंदा जिंकू शकतो आयपीएल ट्रॉफी