टी20 विश्वचषकात रविवारी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (INDvSA) हा सामना खेळला गेला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 134 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिके पुढे ठेवले. या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीला धक्के बसले. मात्र, त्यानंतर डेव्हिड मिलर व ऐडन मार्करम या जोडीने शानदार खेळ दाखवत संघाला 5 गडी राखून विजय मिळवून दिला. दक्षिण आफ्रिकेच्या विजयानंतर ब गटातील उपांत्य फेरीची समीकरणे बदललेली दिसून आली.
सुपर 12 फेरीत ब गटातील सर्वात महत्त्वाचा असलेल्या या सामन्यात दोन्ही संघ विजयाच्या इराद्याने मैदानात उतरलेले. मात्र दक्षिण आफ्रिकेच्य गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत भारताचा डाव केवळ 133 धावांवर रोखला. भारतातर्फे सूर्यकुमार यादव याने सर्वाधिक 68 धावा केल्या. त्यानंतर धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचे तीन बळी केवळ 24 धावात गेलेले. मात्र, ऐडन मार्करम व डेव्हिड मिलर या जोडीने 76 धावांची भागीदारी केली. परंतु, मिलरने अखेरपर्यंत नाबाद राहत संघाला पाच गडी राखून विजय मिळवून दिला.
या विजयानंतर दक्षिण आफ्रिका संघाने 3 सामन्यात 2 विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. त्यांचे 5 गुण झाले आहेत. त्यांचा नेट रनरेट 2.772 इतका आहे. या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी भारतीय संघ असून त्यांचे 4 गुण आणि नेट रनरेट 0.844 असा असून, गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र होतील. नेदरलँड्स आपले पहिले तीनही सामने गमावून स्पर्धेतून जवळपास बाहेर झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या बांगलादेशने तीन सामन्यात दोन विजय संपादन करत स्वतःला अजूनही उपांत्य फेरीच्या शर्यतीत राखले आहे. मात्र, त्यांचा रनरेट -1.533 असा खराब दिसतोय. पाकिस्तानने तीन सामन्यात एक विजय मिळवला असला तरी त्यांचे पुढील सामने दक्षिण आफ्रिका व बांगलादेश यांच्याविरुद्ध होतील. अशीच परिस्थिती असलेल्या झिम्बाब्वेला अखेरच्या दोन सामन्यात नेदरलँड्स व बलाढ्य भारताचे आव्हान असेल. या दोन सामन्यात मोठे विजय मिळवून, भारताच्या पराभवांची प्रार्थना पाकिस्तान संघाला करावी लागेल. भारतीय संघ आपले अखेरचे दोन सामने तुलनेने दुबळ्या असणाऱ्या बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याशी खेळेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मायदेशात दादागिरी करणाऱ्या भारताला दक्षिण आफ्रिकेने विश्वचषकात दाखवला इंगा, केला एकदम करेक्ट कार्यक्रम
एकट्या सूर्याने चोपल्या टीम इंडियातील सर्व खेळाडूंपेक्षा जास्त धावा, पाहा आकडेवारी