वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेचा गुरुवारी (5 ऑक्टोबर) सुरुवात झाली. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर मागील विश्वचषकाचा विजेता इंग्लंड व उपविजेता न्यूझीलंड यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. विजयासाठी मिळालेल्या 283 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडसाठी सलामीवीर डेवॉन कॉनवे याने दीड शतक ( नाबाद152) तर युवा रचिन रवींद्र ( नाबाद 123) याने शतक ठोकत संघाला 9 गडी राखून विजय मिळवून दिला. यासह न्यूझीलंडने आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली.
नाणेफेक जिंकल्यानंतर न्यूझीलंड संघांनी या सामन्यात इंग्लंडला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. जॉनी बेअरस्टो याने आक्रमक सुरुवात केल्यानंतरही इंग्लंडचा डाव काहीसा संकटात सापडला होता. मात्र, 4 बाद 118 या धावसंख्येवरून जो रूट व कर्णधार जोस बटलर यांनी 70 धावांची भागीदारी केली. बटलर 43 धावा करून बाद झाल्यानंतर रूट याने आपली खेळी पुढे नेली. तो 77 धावांवर तंबूत परतला. तळाचे फलंदाज मोठी खेळी न करू शकल्याने इंग्लंडचा डाव 282 धावांवर आटोपला. न्यूझीलंडसाठी मॅट हेन्रीने सर्वाधिक 3 बळी मिळवले.
या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडला पहिला धक्का केवळ दहा धावांवर बसला. विल यंग खातेही न खोलता तंबूत परतला. त्यानंतर मात्र डेवॉन कॉनवे व रचिन रवींद्र यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना एकही संधी दिली नाही. कॉनवेने आपल्या वनडे कारकीर्दीतील पाचवे तर रचिनने पहिले शतक पूर्ण केले. त्यांनी 36.2 षटकांत विजय लक्ष पूर्ण करत संघाला विजय मिळवून दिला. रचिनला या कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार दिला गेला.
(2023 ODI World Cup Newzealand Beat England In Opener Conway And Rachin Ravindra Hits Century)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपचं पहिलं अर्धशतक रुटच्या नावावर, एकट्याने फोडून काढली न्यूझीलंडची गोलंदाजी
‘काय राव हे…?’, पत्रकाराच्या प्रश्नावर रोहितने दिली ‘अशी’ रिऍक्शन, पाकिस्तानी कर्णधार बाबरही झाला लोटपोट