2024 महिला टी20 विश्वचषकाला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. ही स्पर्धा यापूर्वी बांगलादेशमध्ये खेळली जाणार होती. मात्र आयसीसीनं स्थळ बदललं आहे. आता ही स्पर्धा यूएईमध्ये खेळली जाईल. स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 6 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ लवकरच यूईएला रवाना होईल.
वास्तविक, यावेळची महिला टी20 विश्वचषक स्पर्धा बांगलादेशमध्ये होणार होती. परंतु अलीकडे बांगलादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला. देशात अस्थिरता मोठ्या प्रमाणात वाढली. बांगलादेशातील परिस्थिती लक्षात घेता तेथे टी20 विश्वचषकाचं आयोजन करणं सुरक्षित नव्हतं. या कारणास्तव आयसीसीला स्थळ बदलावं लागलं. भारताला यजमानपदासाठी विचारणा करण्यात आली होती. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह यांनी याला होकार दिला नाही. यानंतर हा विश्वचषक यूएईमध्ये हलवण्यात आला.
स्पर्धेतील भारताचा पहिला सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाईल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामनाही दुबईतच होणार आहे. टीम इंडियाचा शेवटचा साखळी सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. हा सामना शारजाहमध्ये खेळला जाईल. महिला टी20 विश्वचषक 2024 चा पहिला उपांत्य सामना 17 ऑक्टोबर रोजी दुबईत होणार आहे. तर दुसरा उपांत्य सामना 18 ऑक्टोबरला होईल. त्यानंतर 20 ऑक्टोबरला अंतिम सामना होणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाईल.
महिला टी20 विश्वचषकात टीम इंडिया हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. स्मृती मंधाना आणि शफाली वर्मा सारख्या स्टार खेळाडू संघात आहेत. याशिवाय दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा आणि यास्तिका भाटिया यांनाही संघात स्थान मिळालंय. पूजा वस्त्राकर, रेणुका सिंग, शोभना आणि सजीवन या संघात आहेत. तर राधा यादव, दयालन हेमलता आणि अरुंधती रेड्डी यांनाही संधी मिळाली आहे.
2024 महिला टी20 विश्वचषकातील भारताचं वेळापत्रक
भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई, 4 ऑक्टोबर
भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई, 6 ऑक्टोबर
भारत विरुद्ध श्रीलंका, दुबई, 9 ऑक्टोबर
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, शारजाह, 13 ऑक्टोबर
हेही वाचा –
मयंक अग्रवालच्या संघानं जिंकली दुलीप ट्रॉफी, फायनलमध्ये ऋतुराजच्या टीमचा पराभव
रिषभ पंतनं काढली एमएस धोनीची आठवण, चेन्नई कसोटीनंतर माजी कर्णधाराबाबत मोठं वक्तव्य
विराट कोहलीनं घेतली बांगलादेशची मजा! मैदानावरील नागिन डान्सचा व्हिडिओ व्हायरल