कोल्हापूर । कुस्तापटू निलेश कणदूरकर याची मृत्यूशी झुंज आज पहाटे अपयशी ठरली. कराडच्या कृष्णा हॉस्पिलमध्ये त्याने अखेरचा श्वास घेतला.
पन्हाळा तालुक्यातील बादेवाडी गावचा उदयोन्मुख मल्ल निलेश कुस्ती आखाड्यात कुस्ती खेळतानाच जखमी झाला होता. कुस्ती खेळताना प्रतिस्पर्धी मल्लाने मानेवर एकचाक डाव खेळला त्यात निलेशच्या मानेची नस तुटून मणके विस्कळीत झाले होते.
गेले काही दिवस त्याच्यावर उपचार सुरू होते.
या खेळाडूची घरची परिस्थिती अतिशय गरीब असून वडील मजुरी करतात. त्याच्या वडीलांनी मोलमजुरी करुन आपल्या दोन्ही मुलांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीत पैलवान बनवलॆ होते. त्याचा भाऊ सुहास हा देखील एक मल्ल आहे.
मागील आठवड्यातच दोन्ही भावांनी पोलीस भरतीचॆ फिजीकल ग्राउंड पास कॆलॆ त्यातही त्यांनी उत्कृष्ट गुण मिळवलॆ आणि आता पाच तॆ सहा दिवसाच्या अंतरावर त्यांची लॆखी परीक्षा होणार होती.
गेल्याच आठवड्यात कबड्डी खेळताना उदयोन्मुख खेळाडू गौरव अमोलचा मृत्यू झाला होता. आज निलेशच्या जाण्याने महाराष्ट्रातील आणखी एक चांगल्या खेळाडूचा दुर्दैवी अंत झाला आहे.
जो कुस्ती सामना खेळताना निलेश जखमी झाला होता त्या सामन्याचा हा विडीओ-