सध्या इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात इंग्लंडच्या जेमी स्मिथनं शानदार शतक झळकावलं. विशेष म्हणजे, स्मिथचा हा केवळ चौथा कसोटी सामना आहे.
मॅनचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड स्टेडियमवर जारी कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी जेमी स्मिथनं ही कामगिरी केली. त्यानं 136 चेंडूत आपलं शतक पूर्ण केले. त्याच्या या खेळीमुळे इंग्लंडला पहिल्या डावात आघाडी घेता आली.
या शतकासह जेमी स्मिथनं एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. तो कसोटीमध्ये शतक झळकावणारा इंग्लंडचा सर्वात तरुण यष्टीरक्षक ठरलाय. त्यानं लेस एम्सचा तब्बल 94 वर्ष जुना विक्रम मोडला. एम्सनं 1930 मध्ये पोर्ट ऑफ स्पेन येथे वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडसाठी शतक ठोकलं होतं. त्यावेळी त्याचं वय 24 वर्ष आणि 63 दिवस होतं.
जेमी स्मिथ डिसेंबर 2022 नंतर इंग्लंडसाठी शतक झळकावणारा पहिला यष्टिरक्षक फलंदाज बनला आहे. इंग्लंडसाठी यष्टीरक्षक ओली पोपनं 18 महिन्यांपूर्वी रावळपिंडीत पाकिस्तानविरुद्ध शतक झळकावलं होतं.
या सामन्यात स्मिथ 148 चेंडूत 111 धावा करून बाद झाला. फिरकीपटू प्रभात जयसूर्यानं त्याला चंदीमलच्या हाती झेलबाद केलं. स्मिथनं आपल्या खेळीत 8 चौकार आणि 1 षटकार लगावला. इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 358 धावा करून ऑलआऊट झाला.
इंग्लंडसाठी कसोटी शतक झळकावणारे सर्वात तरुण यष्टीरक्षक फलंदाज
जेमी स्मिथ – 24 वर्ष आणि 42 दिवस
लेस एम्स – 24 वर्ष आणि 63 दिवस
ॲलन नॉट – 24 वर्षे आणि 330 दिवस
ओली पोप – 24 वर्षे आणि 333 दिवस
हेही वाचा –
काय सांगता! 5 नव्हे तर चक्क 6 दिवस चालेल एक कसोटी सामना! काय आहे कारण?
पाकिस्तानी कर्णधारावर फिक्सिंगचा आरोप? मोहम्मद रिझवानबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित!
आयसीसीची विशेष योजना, आता टी20 प्रमाणे कसोटी खेळाडूंवरही होणार पैशांचा वर्षाव!