भारतात होणाऱ्या फिफा अंडर १७ विश्वचषकाचा थरार काही दिवसांवर आला आहे. या खेळाला मिळणारी प्रसिद्धी आणि लोकप्रियता अफाट आहे. भारतात जे या विश्वचषकासाठीचे वातावरण तयार झाले आहे ते पाहता हा विश्वचषक खूपच लोकप्रिय झाल्यावाचून राहणार नाही. हा विश्वचषक होण्याच्या अगोदर अंडर १७ विश्वचषकासंबंधीच्या काही महत्वाच्या गोष्टी माहिती असायला हव्यात ज्यामुळे तुमचा विश्वचषकाचा थरार हा आपणासाठी एक वेगळाच अनुभव ठरेल.
#१ अंडर १७ विश्वचषकाची सुरुवात झाल्यानंतर १९८५ ते २००५ या कालावधीत अवघे १६ संघ या स्पर्धेत भाग घेत असत. त्यानंतर २००७ पासून या स्पर्धेत २४ संघ सहभाग घेतात.
#२ ब्राझील आणि अमेरिका देशांनी सर्वाधीक १६ वेळेस या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे.
#३ आशिया खंडात ही स्पर्धा सर्वाधीक पाच वेळा आयोजित केली जात आहे. त्यात चीन, जपान, कोरिया रिपब्लिक, संयुक्त अरब अमिराती आणि या वर्षी भारताचा समावेश आहे.
#४ अंडर १७ विश्वचषकात सर्वाधीक यशस्वी संघ हा नायजेरिया आहे. निजरूयाने विक्रमी ५ वेळा या स्पर्धेचे विजेतेपदक पटकावले आहे तर हा संघ तीन वेळा या स्पर्धेचा उपविजेता संघ राहिला आहे. गतवेळेचे विजेते नायजेरिया संघ यावेळी विश्वचषकासाठी स्थान मिळवण्यात अपयशी ठरला आहे.
#५ ब्राझीलने या स्पर्धेचे तीन वेळा विजेतेपद मिळवले आहे. घाना आणि मॅक्सिको यांनी दोन वेळेस ही स्पर्धा जिंकली आहे. तर रशिया,सौदी अरेबिया,फ्रान्स आणि स्विझर्लंड यांनी प्रत्येकी एक वेळेस या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे.
#६ घाना संघाने सलग चार वेळा १९९१, १९९३, १९९५, १९९७ या वर्षात या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. त्यांनी १९९१ आणि १९९५ साली हे स्पर्धा देखील जिंकली.
#७ भारत हा १८ वा देश आहे जो या स्पर्धेत सहभागी होत आहे.
#८ या स्पर्धेत तीन नवीन संघ या स्पर्धेशी जोडले जाणार आहेत. ते म्हणजे निगर , न्यू कॅलेडोनिया आणि भारत.
#९ फिफा अंडर १७ विश्वचषकात खेळले असे १२ खेळाडू आहेत जे फिफा विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात देखील खेळले आहेत. .
#१० ब्राझीलचा महान खेळाडू रोनाल्डिन्हो हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने अंडर १७ विश्वचषक आणि फिफा विश्वचषक दोन्ही जिंकले आहेत.
#११ ज्या खेळाडूंनी अंडर १७ विश्वचषक आणि फिफा विश्वचषक दोन्ही स्पर्धा खेळल्या आहेत त्यात फक्त तीन खेळाडूंनी अंतिम सामन्यात गोल केला
आहे.मारिओ गोटझे, आंद्रे इनिएस्टा आणि इमानुएल पेटिट.
#१२ ज्या खेळाडूंनी अंडर १७ विश्वचषक आणि फिफा विश्वचषक दोन्ही विश्वचषक स्पर्धा खेळल्या त्यात इकार कॅसिल्लास हा एकमेव खेळाडू आहे ज्याने कर्णधार म्हणूनही स्पर्धा जिंकली.
#१३ चौकी बेन सादा, नेवेन सुबोटीक, व्हिक्टर मोझेस, टॉमी स्मिथ आणि हसान ऍबडा ह्या खेळाडूंनी अंडर १७ विश्वचषकामध्ये वेगळ्या देशाचे प्रतिनिधित्व केले आणि फिफा विश्वचषकाचा अंतिम सामन्यात वेगळ्या देशाचे प्रतिनिधित्व केले.
#१४ मेक्सिको सिटी येथे झालेल्या मेक्सिको आणि ऍझटेका या अंतिम सामन्यासाठी सर्वाधीक ९८,९४३ क्रीडाप्रेमींनी हजेरी लावली होती.
#१५ संयुक्त अरब अमिराती येथे झालेल्या विश्वचषकात ५२ सामन्यात सर्वाधीक १७२ गोल झाले होते.
#१६ पहिली स्पर्धा वगळता एका स्पर्धेत सर्वाधीक ७ संघाने नव्याने सहभाग नोंदवला होता. १९८७, १९८९ आणि २००७ या तीन ही वर्षात प्रत्येकी सात संघ नव्याने सहभागी झाले होते.
#१७ या स्पर्धेच्या इतिहासात चारवेळा १९८७, १९८९, १९९९ आणि २००७या वर्षी अंतिम सामन्याचा निकाल हा पेनल्टीमध्ये निश्चित झाला.
# १८ सर्वाधिक गोल करण्याच्या यादीत ब्राझील आणि नायजेरिया यांनी अनुक्रमे १६६ आणि १४९ गोल केले आहेत. तर स्पेन या यादीत तिसर्या क्रमांकावर असून त्यांच्या नावावर ९७ गोल आहेत.
#१९ ब्राझील आणि नायजेरिया हे दोन असे संघ आहेत ज्यांनी सलग दोन वेळा विजेतेपद मिळवले आहे. ब्राझील १९१७ आणि १९९९ तर नायजेरिया २०१३ आणि २०१५.
#२० एकाच खंडातून किंवा गटातून विश्वचषकात प्रवेश मिळवून अंतिम फेरीत खेळण्याची वेळ फक्त दोन वेळेस आली आहे. घाना आणि नायजेरिया १९९३ मध्ये तर नायजेरिया आणि माली २०१५ मध्ये.
#२१ यंदाच्या स्पर्धेतून २०० मिलियन विव्हरशीप मिळवण्याची शक्यता आहे. कारण सोनी २ आणि सोनी ३ हे या स्पर्धेचे प्रायोजक आहेत आणि ते ही स्पर्धा १८५ देशापर्यंत पोहोचवणार आहेत.
#२२ फ्रान्सचा फ्लोरेन्ट सिनामा पँगॉल्ले हा असा एकमेव खेळाडू आहे ज्याने अंडर १७ विश्वचषकात गोल्डन बोट आणि गोल्डन बॉल दोन्ही पुरस्कार एकाच वर्षी मिळवले आहेत. २००१ मध्ये त्याने अशी कामगिरी केली होती.
#२३ फ्रेडी अडू हा एकमेव खेळाडू आहे ज्याने अंडर १७ फिफा विश्वचषक आणि अंडर २० फिफा विश्वचषक या दोन स्पर्धात हॅट्रीक नोंदवणार एकमेव खेळाडू आहे.
#२४ या स्पर्धेत सर्वाधीक चारवेळा नायजेरियन खेळाडूंनी गोल्डन बॉल पुरस्कार पटकावला आहे. त्यात केलेची वॉकली २०१५ साली, केलेची ल्हेणाचो २०१३ साली, सानी इमानुएल २००९ तर फिलिप ऑसुंडो १९८७ साली अशी कामगिरी केली आहे.
#२५ सुलीमन कॅलिबले, फ्लोरेंट पँगोले(फ्रान्स), मार्सेल विटेकझॅक (जर्मनी), हे तीन खेळाडू आहेत ज्यांनी एका स्पर्धेत दोन हॅट्रीक केल्या आहेत.