पुणे । महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) व पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए योनेक्स सनराईज बीव्हीजी करंडक अखिल भारतीय मानांकन(12 व 14वर्षाखालील)टॅलेंट सिरीज टेनिस स्पर्धेत देशभरातून एकूण 250 खेळाडू सहभागी झाले आहेत.
ही स्पर्धा एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, म्हाळुंगे बालेवाडी येथे दि.14 ते 20 एप्रिल 2018 या कालावधीत होणार आहे.
तसेच, ही स्पर्धा 12 व 14 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटांत होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक, प्रशस्तीपत्रक आणि गुण अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धेत कायरा चेतनानी, स्वरा काटकर, श्रेया देशपांडे, ईरा शहा, सोहा पाटील, आस्मि आडकर, ऋषिकेश अय्यर, अर्णव पापरकर, केवल किरपेकर, आर्यन कुरेशी, कुशल चौधरी, अर्णव ओरुगंती हे मानांकित खेळाडू झुंजणार आहेत.