एकीकडे यूएईमध्ये आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांना प्रारंभ झाला आहे. तर दुसरीकडे भारतीय महिला संघ ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध वनडे मालिका खेळण्यात व्यस्त आहे. या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघावर ९ गडी राखून जोरदार विजय मिळवला आहे. यासह वनडे मालिकेत १-० ची आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाला पराभूत करत मोठा किर्तिमान केला आहे. गेल्या ३ वर्षात ऑस्ट्रेलिया महिला संघाने एकही वनडे सामना गमावला नाहीये. त्यांनी सलग २५ वनडे सामन्यात विजय मिळवला आहे. ही एक विश्वविक्रमी कामगिरी आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलियन महिला संघाने नाणेफेक जिंकून भारतीय महिला संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. परंतु भारतीय संघातील सलामीवीर फलंदाज संघाला साजेशी सुरुवात करून देण्यात अपयशी ठरले होते. स्मृती मंधांना आणि शेफाली वर्माकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. परंतु या दोघीही स्वस्तात माघारी परतल्या होत्या.
त्यानंतर कर्णधार मिताली राजने एकहाती झुंज देत १०७ चेंडुंमध्ये ६३ धावांची खेळी केली. तर, यस्टीका भाटियाने ५१ चेंडूंमध्ये ३५ धावांची खेळी केली होती. तर शेवटी रीचा घोषने येऊन ताबडतोड फलंदाजी करत ३२ धावा ठोकल्या. या खेळीच्या जोरावर भारतीय महिला संघाला ५० षटकांअखेर ८ बाद २२५ धावा करण्यात यश आले होते.
भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलिया महिला संघाला विजयासाठी २२६ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलिया महिला संघाकडून रॅचेल हेन्सने सर्वाधिक ९३ धावांची खेळी केली. या खेळी दरम्यान तिने ७ चौकार मारले होते. तर एजे हेलीने ८ चौकार आणि २ षटकारांचा मदतीने ७७ धावांची खेळी केली होती.
ऑस्ट्रेलिया महिला संघातील सलामीवीर फलंदाजांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. त्यानंतर मेग लॅनिंगने देखील अर्धशतकी खेळी करत नाबाद ५३ धावा केल्या होत्या.ज्यामुळे ऑस्ट्रेलिया महिला संघाला हा सामना ५४ चेंडू शिल्लक ठेऊन आणि ९ गडी राखून जिंकण्यात यश आले.
The winning streak goes on and on and on…
A 25th straight ODI win for @AusWomenCricket as they beat India by nine wickets in the #AUSvIND series opener.
Scorecard 👉 https://t.co/pH8bEtSJHw pic.twitter.com/73LqkkUumI
— ICC (@ICC) September 21, 2021
वनडे मालिकेतील दुसरा सामना २४ सप्टेंबर रोजी पार पडणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
बी.कॉम टॉपर, सीए, एमबीए असलेला केकेआरचा ‘स्कॉलर’ अय्यर
एमएस धोनीनंतर कोण होऊ शकतो चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार? ‘हे’ चार नावं आहेत सर्वात पुढे
आरसीबी ९२ धावांवर ऑलआऊट होताच दीपिका पदुकोणचे ११ वर्षांपूर्वीचे ‘ते’ ट्वीट आले चर्चेत