यावर्षी २३ जुलै ते ८ ऑगस्ट या दरम्यान टोकियो येथे ऑलिंपिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने ५ जुलै रोजी २६ सदस्यीय भारतीय पथकाची घोषणा केली आहे. टोकियो ऑलिंपिकमध्ये ऍथलेटिक्सच्या स्पर्धांना ३० जुलै रोजी सुरुवात होणार असून या स्पर्धा अखेरच्या दिवसापर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.
भारताच्या ऍथलेटिक्स खेळांच्या पथकात द्यूती चंदसह एमपी जाबिर, गुरप्रीत सिंग आणि अनु राणी यांना त्यांच्या क्रमवारीच्या आधारावर टोकियो ऑलिंपिकसाठी स्थान मिळाले आहे.
भारताच्या पथकातील २६ जणांपैकी १६ ऍथलिट वैयक्तिक स्पर्धेत सहभागी होतील. तसेच ४०० मीटर रिले स्पर्धेसाठी ५ धावपटूंना आणि ४०० मीटर मिश्रीत रिले स्पर्धेसाठी २ पुरुष आणि ३ महिला धावपटूंना भारताच्या पथकात समावेश आहे. ४०० मीटर मिश्रीत रिले स्पर्धेसाठी निवड झालेल्या ३ महिला धावपटूंची निवड अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने रविवारी ट्रायल घेऊन केली.
अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आदिल सुमरिवालाने भारतीय पथकाकडून चांगल्या कामगिरीची आशा व्यक्त केली आहे.
सुमरिवाला यांनी असेही म्हटले की हे महत्त्वाचे होते की भारताच्या १२ वैयक्तिक ऍथलिटने आणि ४०० मीटर मिश्रीत रिले संघाने जागतिक ऍथलेटिक्सच्या प्रवेश मापदंडांना पूर्ण करुन स्वत: पात्रता सिद्ध केली आहे.
यंदा ऑलिंपिकमध्ये द्यूती चंद, नीरज चोप्रा, अनु राणी, अविनाश साबळे अशा काही खेळाडूंवर सर्वांचेच लक्ष असणार आहे.
#TeamIndia Athletics for @Tokyo2020
All the best ???????? Team#Tokyo2020 #Cheer4India @WeAreTeamIndia @SonySportsIndia pic.twitter.com/7NIiWzSwRs
— Athletics Federation of India (@afiindia) July 5, 2021
अशा प्रकारे आहे भारताचे ऍथलॅटिक पथक
पुरुष खेळाडू – अविनाश साबळे (३००० मीटर स्टीपलचेस), एमपी जाबीर (४०० मीटर हर्डल्स), एम श्रीशंकर (लाँग जम्प), तजिंदरपाल सिंग तोर (शॉट पुट), नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंग (भाला फेक), केटी इरफान, संदीप कुमार आणि राहुल रोहिल्ला (२० किमी चालणे) ,गुरप्रीत सिंग (५० किमी चालणे); ४x४०० मीटर रिले: अमोज जेकब, आरोकीया राजीव, मुहम्मद अनस, नागनाथन पांडी, नोहा निर्मल टॉम; ४x४०० मीटर मिश्रित रिले: सार्थक भांबरी, अॅलेक्स अँटनी.
महिला खेळाडू – द्यूती चंद (१०० मीटर आणि २०० मीटर), कमलप्रीत कौर आणि सीमा अँटिल-पुनिया (थाळी फेक) आणि अनू राणी (भाला फेक); भावना जाट आणि प्रियंका गोस्वामी (२० किमी चालणे); मिश्रित ४x४०० मीटर रिले: रेवती वीरमणि, सुभा वेंकटेशन आणि धनलक्ष्मी शेखर.
महत्त्वाच्या बातम्या –
भारताच्या इंट्रा-स्कॉड मॅचची क्षणचित्रे आली समोर, ‘या’ खेळाडूंनी दाखवला दम
इंग्लंड दौऱ्यातून गिल बाहेर! संघ व्यवस्थापनाने बदली खेळाडू म्हणून सुचवले दोन पर्याय
हजारो प्रेक्षकांच्या साक्षीने ‘या’ खेळाडूने प्रेयसीला केले प्रपोज, व्हिडिओ होतोय व्हायरल






