भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी-20 सामना रविवारी (2 ऑक्टोबर) खेळला गेला. भारताने हा सामना 16 धावांनी जिंकला आणि मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी देखील घेतली. उभय संघातील ही टी-20 मालिका संपल्यानंतर तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका देखील खेळली जाणार आहे. रविवारी बीसीसीआयने या एकदिवसीय मालिकेसाठी संघ घोषित केला. शिखर धवन एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार असून संघात एका नवीन चेहऱ्याचा समावेश केला गेला आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही एकदिवसीय मालिका 6 ऑक्टोबरपासून खेळली जाणार आहे. उभय संघातील या एकदिवसीय मालिकेत एक खेळाडू आहे, जो भारतासाठी पदार्पण करणार आहे. या खेळाडूचे नाव आहे मुकेश कुमार (Mukesh Kumar). आपण या लेखात मुकेशचा इथपर्यंतचा प्रवास जाणून घेणार आहोत.
कोण आहे मुकेश कुमार –
29 वर्षीय मुकेश कुमारचा जन्म बिहारमध्ये गोपालगंज जिल्ह्यातील ककरकुंड गावात झाला. त्याचे वडील काशीनाथ सिंग कोलकाता शहरात रिक्षा चालवतात. तो लहानपणापासून गल्लीतील मित्रांसोबत क्रिकेट खेळत आला आहे. पुढे त्यांची क्रिकेटमध्ये रूची दिवसेंदिवस वाढत गेली. त्यानंतर त्याने गोपालगंजमध्ये एका क्रिकेट स्पर्धेतील सात सामन्यांमद्ये 35 विकेट्स घेतल्या. या कामगिरीनंतर त्याला जिल्ह्याच्या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली. पुढे त्याने बिहारसाठी खेळताना 19 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्याचे वडील काशीनाथ सिंग यांचे मागच्या वर्षी निधन झाले. पण तरीही मुकेशने धीर सोडला नाही. त्याने स्वतःच्या खेळावर या गोष्टीचा परिणाम होऊ दिला नाही.
आगामी टी-20 विश्वचषक अवघ्या काही आठवड्यांवर आला असल्यामुळे संघातील वरिष्ठ खेळाडूंना आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत विश्रांती दिली गेली आहे. अशात युवा खेळाडूंना या संघात संधी दिली गेली आहे. मुकेशला तो राष्ट्रीय संघात सहभागी झाल्याची खबर तोपर्यंत माहिती नव्हती, जोपर्यंत त्याला भारतीय संघाच्या वॉट्सऍप ग्रुपमध्ये सहभागी केले गेले नव्हते. या ग्रुपमध्ये सहभागी झाल्यानंतर त्याला याबाबत माहिती मिळाली. मुकेशने सध्या सुरू असलेल्या इराणी ट्रॉपी स्पर्धेत रेस्ट ऑफ इंडियासाठी चमकदार कामगिरी केली. त्याची उत्कृष्ट गोलंदाजी पाहूनच त्याला भारतीय संघात निवडले गेल्याचे सांगितले जात आहे.
त्याने यापूर्वी बंगाल आणि भारत अ संघाचे प्रतिनिधित्वही केले आहे. सध्या सुरू असलेल्या इराण ट्रॉफीमध्ये त्याने रेस्ट ऑफ इंडियासाठी सौराष्ट्र संघाविरुद्ध भेदक गोलंदाजीचे प्रदर्शन केले. सौराष्ट्रविरुद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात 10 षटकात 23 धावा देत चार विकेट्स घेतल्या. दुसऱ्या डावात देखील चांचे प्रदर्शन अशाच प्रकारे चांलू आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी निवडलेला भारतीय संघ –
शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव. , रवी बिश्नोई, मुकेश कुमार, आवेश खान, मोहम्मद. सिराज, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
INDvSA: ‘सूर्याच खरा गेमचेंजर’, मॅन ऑफ द मॅच ठरलेल्या राहुलचे आश्चर्यकारक विधान
VIDEO | मिचेल जॉन्सन आणि युसूफ पठाणमध्ये भर मैदानात हातापायी, पाहा नेमकं काय घडलं
आता फक्त सूर्यकुमारला खुश ठेवायचे आहे! विजायानंतर कर्णधार रोहित शर्माची खास प्रतिक्रिया