न्यूझीलंड आणि पाकिस्तान संघांमधील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना ख्राइस्टचर्च येथे नुकताच संपन्न झाला. या सामन्यात अपेक्षेप्रमाणेच न्यूझीलंड संघाने उत्तम कामगिरी करत पाकिस्तानचा तब्बल 1 डाव व 176 धावांनी पराभव केला आहे. न्यूझीलंडकडून मागील 20 वर्षात पाकिस्तानला मिळालेली ही सर्वात मोठी हार आहे. यापूर्वी 2001 झाली न्यूझीलंडने पाकिस्तानचा 1 डाव आणि 185 धावांनी पराभव केला होता.
सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तान संघाचा पहिला डाव 297 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने आपला डाव 6 गडी गमावत 659 धावांवर घोषित केला. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने शानदार 238 धावांची खेळी केली. तसेच हेन्री निकोल्स(157) आणि डॅरिल मिशेल(102*) यांनी शतकी खेळी केली.
पाकिस्तानचा दुसरा डावही सुरुवातीपासूनच लडखडत होता व पूर्ण संघ केवळ 186 धावांवर बाद झाला. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज काइल जेमिसनला आपल्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर घोषित करण्यात आले. जेमिसनने पहिल्या डावात 5 तर दुसऱ्या डावात 6 बळी मिळवले होते. तसेच त्याने फलंदाजी करताना नाबाद 30 धावा केल्या होत्या.
मालिकेतील पहिल्या सामन्यात देखील न्यूझीलंडने पाकिस्तानचा पराभव केलेला होता. दोन सामन्यांच्या या मालिकेत न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला मालिकावीराचा पुरस्कार देण्यात आला. विल्यम्सनने दोन्ही सामन्यात शतकी खेळी केली होती. पाकिस्तानच्या या पराभवानंतर सर्वस्तरातून त्यांच्यावर टीकेचा भडीमार होत आहे, व आगामी मालिकांमध्ये पाकिस्तान संघात मोठे बदल करण्याची मागणी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
…आणि त्यादिवशी कपिल देव यांनी ठरवले की भारताचा यशस्वी वेगवान गोलंदाज होऊनच दाखवेल
सौरव गांगुलींना आलेल्या हार्ट अटॅकमुळे ‘या’ कंपनीने हटवल्या जाहिराती
जेमिसनच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानी फलंदाजाचे लोटांगण, ११ विकेट्स घेत केली दिग्गजाची बरोबरी