भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासाची पाने उलगडली तर एक गोष्ट लक्षात येते, ती अशी की, सुरुवातीला भारतीय संघाचे कसोटीतील प्रदर्शन जास्त चांगले नव्हते. आकडेवारींवरून हे स्पष्ट होते की, पुर्वी पाकिस्तान आणि इतर संघांचे कसोटीतील प्रदर्शन हे भारतापेक्षा चांगले होते.
असे असले तरी, वेळोवेळी भारतीय कसोटी संघात बरेच दमदार क्रिकेटपटू होऊन गेले आहेत. काही नावे अशी आहेत, ज्यांना कसोटी पदार्पणाच्या सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. पण, पुढे त्यांनी मोठे नाव कमावले. तर, काही नावे अशी आहेत, ज्यांनी पदार्पणाच्या सामन्यातच आपली छाप पाडली आणि पुढे अनेक वर्षे आपली कसोटी कारकिर्द गाजवली.
विशेष म्हणजे, पहिल्याच कसोटी मालिकेत मालिकेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू बनणे, ही खूप मोठी गोष्ट समजली जाते. भारतीय कसोटी संघात असे ३ खेळाडू आहेत, जे कसोटी पदार्पणात मालिकावीर पुरस्काराचे मानकरी ठरले.
या लेखात आपण जाणून घेणार आहोत, त्या ३ भारतीय कसोटीपटूंना ज्यांना पदार्पणाच्या सामन्यात मालिकावीर पुरस्कार मिळाला आहे. 3 Indian batsman become man of the series in test debut.
सौरव गांगुली-
भारताचा माजी क्रिकेटपटू आणि सध्याचा बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीने भारतीय संघासाठी मोलाचे योगदान दिले आहे. जून १९९६मध्ये लॉर्ड्स येथील इंग्लंडविरुद्धच्या ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून त्याने कसोटीत पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातील पहिल्या डावात त्याने ३०१ चेंडूत १३१ धावा केल्या होत्या. यात त्याच्या २० चौकारांचा समावेश होता.
तर, पुढील शेवटच्या सामन्यातील २ डावात गांगुलीने अनुक्रमे १३६ आणि ४८ धावा केल्या होत्या. त्याच्या या जबरदस्त कामगिरीमुळे तो मालिकावीर ठरला होता.
रोहित शर्मा-
भारताचा हिटमॅन रोहित शर्माने नोव्हेंबर २०१३मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून कसोटीत पदार्पण केले होते. कोलकाता येथे झालेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात रोहितने ३०१ चेंडूत १७७ धावा केल्या होत्या. यात त्याच्या एका षटकाराचा आणि २३ चौकारांचा समावेश होता.
तर, मुंबई येथे झालेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात रोहितने १२७ चेंडूत नाबाद १११ धावांची खेळी केली होती. त्याच्या या दमदार खेळीने तो मालिकावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. विशेष म्हणजे, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा हा शेवटचा कसोटी सामना होता.
पृथ्वी शॉ-
भारताचा युवा क्रिकेटपटू पृथ्वी शॉने ऑक्टोबर २०१८ला वेस्ट इंडिजविरुद्धच्या २ सामन्यांच्या कसोटी मालिकेतून पदार्पण केले होते. राजकोट येथे पार पडलेल्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने १५४ चेंडूत १३४ धावांची खेळी केली होती. यात त्याच्या १९ चौकारांचा समावेश होता.
तर, हैद्राबाद येथे पार पडलेल्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शॉने पहिल्या डावात ७० आणि दुसऱ्या डावात नाबाद ३३ धावा केल्या होत्या. त्याच्या या कामगिरीने भारताने २-०ने ती कसोटी मालिका खिशात घातली होती. म्हणून शॉला मालिकावीर पुरस्कार मिळाला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
जाणून घ्या ११९२ सालापासून क्षेत्ररक्षणात झालेले मोठे बदल
पोलार्ड, मलिंगासह परदेशी खेळाडूंशिवाय अशी होईल जबरदस्त मुंबई इंडियन्स