भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला क्रिकेटविश्वातील सर्वात खरतनाक गोलंदाजांमध्ये गणले जाते. बऱ्याचदा भलेभले फलंदाजही त्याच्यापुढे गुडघे टेकताना दिसतात. मायदेशातील मैदानांबरोबरच परदेशातील मैदानांवरही त्याची नाणे खणखणीत वाजले आहे. त्यामुळे कोणताही फलंदाज त्याच्या गोलंदाजीवर फलंदाजी करण्यास घाबरतो. मात्र असेही काही फलंदाज आहेत, ज्यांनी जगप्रसिद्ध इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळताना बुमराहविरुद्ध खोऱ्याने धावा काढल्या आहेत.
बुमराहविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांबद्दल बोलायचे झाल्यास (Most Runs Against Jasprit Bumrah in ipl), टॉप-३ मध्ये असलेल्या फलंदाजांपैकी फक्त एका फलंदाजाचा स्ट्राईक रेट १५० पेक्षा जास्त आहे. तर इतर २ फलंदाजांचा स्ट्राईक रेट १३० ते १५० च्या दरम्यान आहे. याव्यतिरिक्त फक्त एक फलंदाज त्याच्याविरुद्ध ५५ पेक्षा जास्त सरासरीने धावा केल्या आहेत. तर इतर २ फलंदाज ३०-४५ च्या सरासरीने धावा करू शकले आहेत. याच ३ फलंदाजांबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) विरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
३. केएल राहुल (KL Rahul)
बुमराहविरुद्ध आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा फटकावणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुलचे नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर १० डावांमध्ये १३२.१४ च्या स्ट्राईक रेटने आणि ५५.५० च्या सरासरीने फलंदाजी करताना १११ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १० चौकार आणि ४ षटकार निघाले आहेत. बुमराहने राहुलला ८४ चेंडू टाकले आहेत, ज्यामध्ये तो २ वेळा राहुलला बाद करू शकला आहे. राहुल आयपीएल २०२२ मध्ये लखनऊ सुपर जायंट्सचे नेतृत्व करताना दिसेल.
२. एबी डिविलियर्स (AB De Villers)
या यादीत दुसऱ्या क्रमांकावर एबी डिविलियर्सचे नाव येते. डिविलियर्सने बुमराहविरुद्ध १३ डावांमध्ये १४७.०५ च्या स्ट्राईक रेटने आणि ४१.६६ च्या सरासरीने १२५ धावा फटकावल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून ९ चौकार आणि ८ षटकार निघाले आहेत. बुमराहने त्याला ८५ चेंडू टाकले असून ३ वेळा त्याची विकेट घेतली आहे.
१. विराट कोहली (Virat Kohli)
बुमराहविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याचा पराक्रम विराट कोहलीने केला आहे. त्याने आयपीएलमध्ये बुमराहविरुद्ध १४ डावांमध्ये १५० च्या स्ट्राईक रेटने आणि ३१.५० च्या सरासरीने १२६ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याच्या बॅटमधून १४ चौकार आणि ५ षटकार निघाले आहेत. बुमराहला त्याला ८४ चेंडू फेकले असून ४ वेळा त्याला तंबूत धाडले आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विंडीज गोलंदाजाने क्रिकेटमध्ये आणले नवे बेबी सेलिब्रेशन; मैदानातच व्हिडिओ कॉल करत म्हटले, ‘हाय बेबी’