भारत-ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांची बाॅर्डर-गावसकर मालिका खेळली गेली. या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना सिडनीच्या मैदानावर खेळला गेला, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा 6 गडी राखून धुव्वा उडवला. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 3-1 ने जिंकली आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट मिळवले. हा सामना जिंकण्यासाठी भारताने ऑस्ट्रेलियासमोर 162 धावांचे लक्ष्य ठेवले होते, जे ऑस्ट्रेलियाने 4 गडी गमावून पूर्ण केले. तत्पूर्वी सिडनी कसोटीत झालेल्या 3 मोठ्या रेकाॅर्डबद्दल आपण जाणून घेऊया.
1) चेंडूंच्या बाबतीत सिडनीमध्ये खेळलेला तिसरा सर्वात लहान सामना- भारत-ऑस्ट्रेलिया संघात खेळला जाणारा हा सामना चेंडूंच्या बाबतीत तिसरा सर्वात लहान सामना आहे. हा सामना 1,145 चेंडूत संपला. या मैदानावर दुसरा, चौथा सामना 1888 मध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलिया संघात खेळला गेला होता, ज्याचा निकाल 1,129 चेंडूत लागला होता. सिडनी येथे 1895 मध्ये ऑस्ट्रेलिया-इंग्लंड संघात सर्वात लहान सामना खेळला गेला होता, ज्याचा निकाल फक्त 911 चेंडूत आला होता.
2) स्टीव्ह स्मिथ हा त्याच्या कसोटी कारकिर्दीत 9,999 धावांवर बाद होणारा दुसरा फलंदाज ठरला- सिडनी कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा फलंदाज ‘स्टीव्ह स्मिथ’ला (Steve Smith) त्याच्या कसोटी कारकिर्दीत 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी 38 धावांची गरज होती. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात तो 33 धावांवर बाद झाला. स्मिथ दुसऱ्या डावात नक्कीच 10 हजार धावा पूर्ण करेल असे चाहत्यांना वाटत होते, पण ‘प्रसिध क्रिष्णा’ने (Prasidh Krishna) त्याला 4 धावांवर बाद करून पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. अशाप्रकारे स्मिथ 9,999 धावांवर बाद झाला.
3) पॅट कमिन्सच्या WTC मध्ये 200 विकेट्स पूर्ण- जसप्रीत बुमराहनंतर पॅट कमिन्स बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 5 सामन्यात एकूण 25 विकेट्स घेतल्या. सिडनी कसोटीत त्याने पहिल्या डावात 2 विकेट्स घेतल्या होत्या, तर दुसऱ्या डावात कमिन्सला 3 विकेट्स घेण्यात यश आले. या 5 विकेट्सच्या मदतीने कमिन्स आता आयसीसी ‘जागतिक कसोटी चॅम्पियनशिप’मध्ये (World Test Championship) 200 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित शर्मा, विराट कोहलीची कसोटी कारकिर्द धोक्यात? पाहा आकडेवारी
IND vs AUS; विजयानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार म्हणाला, “भारतासारख्या संघाला…”
बाप तसा लेक! वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून वीरेंद्र सेहवागच्या मुलाचा गोलंदाजीत जलवा